Home विधानसभा सावनेर मताच्या माध्यमातून तुम्ही मला आमदार केलं मी त्याची परतफेड विकास कामाच्या माध्यमातून...

मताच्या माध्यमातून तुम्ही मला आमदार केलं मी त्याची परतफेड विकास कामाच्या माध्यमातून करणार – डॉ.आशिष देशमुख (सावनेर – कळमेश्वर विधानसभा)

66
0

सावनेर
दि.८ जानेवारी २०२५ रोजी सावनेर च्या जाहीर सभेत आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी जनतेला संबोधित केले. त्याप्रसंगी,‘येत्या काळात आपल्याला चांगल्या संस्कृतीचं, चांगल्या विचारांचं, चांगल्या विकास कामांचं राजकारण करायचं आहे. हा आशिष तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून सातत्याने मी इमाने इतबारे, प्रेमाने, जिव्हाळ्याने,आपुलकीने तुमच्या सर्वांची सेवा करीन.आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या आशा, आकांक्षा, अपेक्षा प्रत्येक मतांच्या माध्यमातून तुम्ही माझ्यासाठी दिल्या, त्याची परतफेड विकासाच्या कामाच्या माध्यमातून, जनतेच्या सेवेच्या माध्यामातून येणाऱ्या काळात मी करून दाखवेल. अशी जिद्द मी माझ्या मनामध्ये बाळगली आहे. त्यासाठी आपण मेहनत करतो आहे. अतिशय चांगलं असं काम या माध्यामातून केले जाईल. सावनेर मध्ये असणाऱ्या पोटेंशीअलच्या माध्यमातून या विदर्भातच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये सावनेर विधानसभा क्षेत्राला पहिल्यानंबर करण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करू ’असा विश्वास जनतेला दिला आणि त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here