Home विधानसभा सावनेर नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

83
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
आज सावनेर–कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA ),नागपूर येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मी आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांना आणि विकासाच्या गरजांना वाचा फोडण्यासाठी उपस्थित होतो.
सावनेर आणि कळमेश्वर परिसरातील सुरू असलेल्या व प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती घेतली, तसेच अडथळे दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या. रस्ते, पाणीपुरवठा, नाले, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रातील प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी मी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली.
या बैठकीत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी, तसेच सहआयुक्त श्री. सचिन ढोले, श्री. श्रीराम मुंदडा, श्री. संजय चिमूरकर, श्री. संदीप राऊत, श्री. पंकज पाटील आणि श्री. सचिन पावडे हे मान्यवर उपस्थित होते. बैठकीत जनहितासाठी प्रत्येक निर्णय पारदर्शक आणि वेळेवर व्हावा, यावर भर देण्यात आला. सावनेर–कळमेश्वर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून, प्रत्येक कामात जनतेच्या गरजा आणि हित लक्षात घेऊन पुढील पावले उचलली जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here