Home Breaking News मोहगाव झिल्पी येथे नामगजर व पालखी सोहळा संपन्न

मोहगाव झिल्पी येथे नामगजर व पालखी सोहळा संपन्न

49
0

हिंगणा
मोहगाव झिलपी येथे असलेल्या नरेंद्राचार्य महाराज पुर्व विदर्भ पीठ मठावर नामगजर सोहळा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या मठावर दुपारला नामगजर सोहळा संपन्न झाला यावेळी भक्त. भगीनींनी कुंडल घालत भक्तीमय संगीता च्या तालावर मन एकांत करीत नरेंद्राचार्य महाराज यांचा जयघोष करीत नामगजर सोहळा संपन्न झाला..
तसेच या मठावर दर शनिवार ला पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.दि.२१ जुनला या पालखी सोहळ्याचे यजमान पद हे सावनेर तालुक्याला देण्यात आले होते.या सोहळ्यात हजारो भक्त भगीनी यांनी भाग घेतला होता.यावेळी संपुर्ण परीसर भगवा ड्रेस व भगवाधारी फेटे बांधून संपूर्ण परीसर भक्तीमय झाला होता.हा पालखी सोहळा सायंकाळी सहा वाजता सुरू करण्यात आला होता.भजन कीर्तन च्या तालावर भक्त भगीनी नाचत डोलत नरेंद्राचार्य महाराज यांचा जयघोष देत संपुर्ण पिठाला वेढा घालण्यात आला. कार्यक्रमाची सांगता महाभोजन देऊन करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने देवेंद्र दलाल.तालुका अध्यक्ष उमेश काळे.संजय मानकर. मोरेश्वर पुंड.विठ्ठल मिरासे.चंदु सातपुते.संगीता भलावी. राजेंद्र जोगी.अक्षय अंबरते. पुरुषोत्तम नागपुरकर तसेच सेवा केंद्र अध्यक्ष.भक्त.भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here