Home राजकीय सावनेरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; माजी उपाध्यक्ष गोपाल घटे यांच्या रा.काँ. (अजित पवार...

सावनेरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; माजी उपाध्यक्ष गोपाल घटे यांच्या रा.काँ. (अजित पवार गटात) पक्षप्रवेश— पत्नी वैशाली घटे उद्या नगराध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरणार!

81
0

सावनेरच्या राजकारणात आज प्रचंड खळबळ उडाली. नगरपरिषद निवडणुकीच्या उंबरठ्यावर काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला असून माजी उपाध्यक्ष गोपाल घटे यांनी भाजपऐवजी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटात) प्रवेश करून मोठा राजकीय स्फोट घडवून आणला. घटे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनीही काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करून आगामी निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलून टाकले आहे.
गोपाल घटे हे माजी मंत्री सुनील केदार यांचे निष्ठावान समर्थक मानले जात असतानाच त्यांचा हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का म्हणून पाहिला जात आहे. स्थानिक पातळीवरील अंतर्गत नाराजीतूनच हा स्फोट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान,गोपाल घटे यांनी स्पष्ट केले की त्यांच्या पत्नी वैशाली गोपाल घटे या उद्या सावनेर नगराध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या या उमेदवारीनंतर निवडणूक अधिक चुरशीची होण्याचे संकेत मिळत असून सावनेरच्या राजकारणात नवीन शक्तिसंतुलन तयार झाले आहे.सावनेरची निवडणूक आता आणखी रंगणार,यात शंका नाही!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here