*”धनोजे कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित”*
*कार्यक्रम दिनांक :-* 18 सप्टेंबर 2021 शनिवार रोजी सकाळी 11.30 वाजता.
*ठिकाण :-* वानखेडे सभागृह, पांढूरना रोड, सावनेर.
सर्व समाज बांधवांना कळविण्यात येते की, काल सकाळी नयन डेव्हलपर्स गुजरखेड़ी नागपूर रोड येथे समाजातील युवा कार्यकर्त्यांची सभा झाली त्यात 25 कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी समाज कार्याबाबत सविस्तर चर्चा करुन वरील प्रमाणे कार्यक्रामाचे आयोजन केलेले आहे.
*1)* कार्यक्रमात वर्ग 10 आणि 12 पास विद्यार्थी (80% पेक्षा जास्त),
*2)* ईतर सर्वच क्षेत्रातील पदविका आणि पदवी (70% पेक्षा जास्त),
*3)* पदव्युत्तर आणि आचार्य (गुणांची अट नाही)…..
यांचा सत्कार करण्याचे ठरलेले आहे.
*4)* तसेच आपला समाज हा मुळ शेतकरी असल्याने…. कृषीक्षेत्रातील प्राविण्यप्राप्त, आधुनिक पध्दतीने प्रगत अशा शेतक-याचा सुध्दा सत्कार करायचा असे ठरलेले आहे.
*5)* वरील कार्यक्रमाचे आयोजनाकरिता श्री विजयजी निखाडे सावनेर यांचे नेतृत्वात 11 कार्यकर्त्यांची आयोजन समिती नियुक्त करण्यात आलेली आहे.
तरी सर्वांना विनंती आहे की, वरील प्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांची गुणपत्रिका झेरॉक्स प्रत आमचेकडे 7 दिवसांचे आंत जमा करावी… तसेच गुणवंतांना काही बक्षिसे द्यावयाची असल्यास त्याची सुद्धा माहिती द्यावी….. धन्यवाद!
*राजेंद्र आर. बोढे, मोबा.नं. +918975100775*
समाज सेवक/सदस्य आयोजन समिती.
शिवाजी प्रिंटिंग प्रेस सावनेर.




