गिरीश आंदे ( तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
डॉ. हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालय सावनेर तर्फे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन नांदिखेडा ता.कळमेश्वर जि.नागपुर येथे दिनांक २४ डिसेंबर २०२४ ला करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.विरेंद्र जुमडे सर,जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.कृष्णराव पांडव,ग्रामपंचायत नांदिखेडा सरपंच श्री देवेंद्रजी बोढे, ग्रामपंचायत तिडंगी सरपंच श्री. रामभाऊ मारबते,ग्रामपंचायत नांदिखेडा उपसरपंच श्री.विठोबाजी रडके, ग्रामपंचायत सदस्य नांदिखेडा श्री.मनीषजी मांडवगडे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या आयोजन डॉ.श्री कृष्णराव राऊत आणि संचालन डॉ.श्रीमती अर्चना पाटील व आभार प्रदर्शन डॉ.श्री.प्रमोदजी लेंडे यांनी केले.




