Home Breaking News खात येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन संपन्न – माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्या...

खात येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन संपन्न – माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

48
0

मौदा तालुक्यातील ग्रामपंचायत खात येथे दि. १९ नोव्हेंबर रोजी विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार टेकचंद सावरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष मुकेश अग्रवाल हे होते, तर विशेष पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या राधा मुकेश अग्रवाल उपस्थित होत्या. यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच माधुरी वैद्य, उपसरपंच रविंद्र मंडारकर, कैलास वैद्य, भाजपा खात अध्यक्ष राजेश गिरिपुंजे, राकेश बागडे, पुरुषोत्तम शर्मा, कांचन देवतारे तसेच संतोष गिरिपुंजे, रमन पटले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजन समारंभानंतर उपस्थित मान्यवरांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शुभेच्छा दिल्या. गावकऱ्यांनीही या विकासकामांचे स्वागत करीत मान्यवरांच स्वागत केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, भाजपा पदाधिकारी व गावकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here