गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
इंडिया लाईव्ह तेज न्यूज मध्ये दिनांक ९ जुलै २०२५ रोजी “कळमेश्वर तालुक्यातील पांधण रस्त्यांच्या समस्येला केव्हा बसेल अंकुश ?”या मथळ्याखाली न्युज प्रकाशित करतातच दुसऱ्याच दिवशी “कित्येक वर्षापासून रखडलेले तेलकामठी ते हेटी (नंदाजी) ग्रा.मा.१९ वरील शेतकरी देविदास बाबुराव तुरणकर यांच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत 3054 अंतर्गत होत असलेल्या पांधन रस्तेच्या कामाबाबतच्या तक्रारीचा अनुषंगाने राजेश पुलरवार उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग सावनेर जिल्हा परिषद नागपूर पांधण रस्त्यावर उतरले आहेत.
तर काल प्रकाशित केलेली न्युज”कळमेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पांधण रस्त्याची कामे झाली असून अथवा काहींची कामे सुरू असून त्या कामांमध्ये ठेकेदार व राजकीय वर्ग यांच्या कडून अधिकाऱ्यांना हातात धरून वारंवार निकृष्ट दर्जाची काम होत असून तालुक्यातील अनेक गावातील पांधण रस्ते पावसाळ्याच्या पहिल्याच पाण्यात वाहून गेले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.तर काहींची कामे अजून पर्यंत प्रलंबित असून त्यामध्ये अधिकारी यांच्याकडून कामे झाले असल्याची माहिती कागदोपत्री दाखवून पैसे लाटल्याचा प्रकार तालुक्यात गावामध्ये जोरात – सौरात पाहायला मिळत आहे. या असल्या भौगळ कारभारामुळे तालुक्यातील नागरिकांची पांधण रस्त्याने जाण्याचे तर सोडा शेती करणे सुद्धा अडचणीत आली आहे.अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेताजवळील पांधण रस्त्यांच्या काम निकृष्ट दर्जाच्या केले असल्यामुळे पावसाच्या पाण्याची तळे शेतात साचलेली पहायला मिळत आहेत.त्यात कित्येक वर्षापासून रखडलेले तेलकामठी ते हेटी (नंदाजी) ग्रा.मा.१९ वरील शेतकरी देविदास बाबुराव तुरणकर यांच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत 3054 अंतर्गत होत असलेल्या पांधन रस्तेच्या कामाबाबतच्या तक्रारीचा सुद्धा समावेश आहे.”अशाप्रकारे होती.
या न्यूज मध्येच उल्लेख केलेल्या तेलकामठी ते हेटी (नंदाजी) ग्रा.मा.१९ वरील शेतकरी देविदास बाबुराव तुरणकर यांच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत 3054 अंतर्गत होत असलेल्या पांधन रस्तेच्या कामाबाबतच्या तक्रारीचा अनुषंगाने आज राजेश पुलरवार उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग सावनेर जिल्हा परिषद नागपूर व ठेकेदार यांच्या देखरेख करणारा माणूस संजय दियेवार व शेतकरी देविदास बाबुराव तुरणकर सीडी वर्क च्या ठिकाणी उपस्थित होते.
यावेळी राजेश पुलरवार उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग सावनेर जिल्हा परिषद नागपूर यांनी शेतकरी व ठेकेदार यांची मते जाणून घेऊन त्यावर त्यांनी तोंडी भाषेत शेतकऱ्याला सांगितले की, तुम्ही मला सीडी वर्क करण्याकरिता स्वतःची शेतकरी म्हणून सहमती पत्र आणून द्या व या सीडी वर्क ला करण्यास कोणती पण अडचण आल्यास त्याची जबाबदारी शेतकरी म्हणून माझी असेल असे त्या सहमती पत्रात लिहून द्या नंतर मी काम करण्यास सांगतो असा शेतकरी देविदास बाबुराव तुरणकर यांना समज दिला आहे.
तर ठेकेदार यांच्या देखरेख करणारा माणूस संजय दियेवार यांनी ठेकेदाराची बाजू मांडताना तोंडी म्हटले आहे की,राजेश पुलरवार उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग सावनेर जिल्हा परिषद नागपूर हे जशाप्रकारे म्हणतील त्या प्रकारे आम्ही काम करण्यास तयार आहे.
तर यावर शेतकरी देविदास बाबुराव तुरणकर यांनी सुद्धा तोंडी म्हटले आहे की, मी सुरुवातीलाच केलेल्या तक्रारीचे निराकारण तुम्ही ठेकेदार राजकीय वर्ग व अधिकारी मिळून कागदोपत्री बंद केलेल्या आहे त्याची माहिती द्या ? आता माझ्याकडून सहमती पत्र लिहून देत नाही ? तुम्हाला सी डी वर्क चे काम करायचे असेल तर करा अन्यथा मी स्वतः शेतकरी म्हणून टोकाची भूमिका घेईल.
Home Breaking News कळमेश्वर तालुक्यातील कागदोपत्री बंद झालेल्या पांधण रस्त्याच्या समस्येवर अभियंत्यानी केली शेतकऱ्याला सहमती...




