गिरीश आंदे
जागतिक सायकल दिनानिमित्त पोलीस स्टेशन कळमेश्वरच्या वतीने रविवारी सकाळी ७ वाजता क्रीडा संकुल मैदान कळमेश्वर येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आरोग्य संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि सायकलिंगचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सदर कार्यक्रम सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सागर खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला.
या रॅलीमध्ये कळमेश्वर शहरातील सुमारे ५० ते ६० मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. याशिवाय पोलीस स्टेशन कळमेश्वरचे पोलीस अधिकारी,पोलीस अंमलदार,पोलीस मित्र, होमगार्ड, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमास घनश्याम मकासरे,बगडे गुरुजी तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांची विशेष उपस्थिती लाभली. सायकलिंगमुळे आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचे संवर्धन होते,असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी सागर खर्डे यांनी कळमेश्वर येथील क्रीडा संकुलाला भेट देऊन खेळाडूंशी संवाद साधला. खेळातील शिस्त, कठोर परिश्रम आणि सातत्य यांचे महत्त्व सांगत त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध वातावरणात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
Home जागरुकता जागतिक सायकल दिनानिमित्त पोलीस स्टेशन कळमेश्वरची सायकल रॅली – आरोग्य,पर्यावरण संवर्धनाचा दिला...




