Home शैक्षणिक शाळा महाविद्यालयात खेळाला विशेष महत्व द्या-आमदार डॉ आशिष देशमुख

शाळा महाविद्यालयात खेळाला विशेष महत्व द्या-आमदार डॉ आशिष देशमुख

118
0

खापरखेडा-प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होने काळाची गरज आहे दैनंदिन जिवनात अभ्यासा सोबत खेळाला महत्व देने फार आवश्यक आहे उत्कृष्ठ मैदान व सरावा मुळेच क्रिकेटपटू उमेश यादव यांनी आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरले आहे त्यामूळे खेळाच्या मैदानाच्या विकास होने गरजेचे आहे यासाठी खापरखेडा औष्णिक वीज केंद्र प्रशासनाने प्रयत्न करावेत शिवाय खेळाच्या मैदानावर शाळेतल्या विद्यार्थ्यांना सोबत परिसरातील खेळाडूंना प्रवेश द्यावा असे आवाहन आमदार डॉ आशिष देशमुख यांनी केले ते शंकरराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी शाळा खापरखेडा येथे वार्षिक स्पोर्ट डे उदघाटन कार्यक्रमाला २४ डिसेंबर मंगळवारला आले असतांना बोलत होते.

डॉ आशिष देशमुख पुढे म्हणाले शंकरराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी शाळा फार जुनी आहे शालेय इमारत जीर्ण झाली आहे खापरखेडा औष्णिक वीज केंद्राने ऊर्जा विभागाकडे नविन शालेय इमारतीचा प्रस्ताव सादर करावा जेणेकरून ऊर्जा विभागाच्या माध्यमातून नविन शालेय इमारत मंजूर करता येईल शिवाय परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देता येईल असे आमदार डॉ आशिष देशमुख यांनी यावेळी सांगितले.

वार्षिक स्पोर्ट डे कार्यक्रमाचे उदघाटन आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता विराज चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण अधिकारी आनंद वाघमारे, कार्यकारी अभियंता धारस्कर, सुरेंद्र यावले, संस्था सचिव ईश्वर राऊत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर चौधरी, माजी समाजकल्याण सभापती दीपक गेडाम, सरपंच शालिनी चवरे, रमेश जैन, मुख्याध्यापक विमलप्रकाश मिश्रा, किशोर बक्सरिया, सुनील जालंदर, गणेश चिखले, सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे, कमलेश भास्कर, अरुण अंजनकर, विपीन नाईक, श्यामराव सरोदे, विलास महल्ले, राजेश गायकवाड, चंद्रशेखर पानतावणे, मुख्याध्यापिका मोनाली सुरकार आदि मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार डॉ आशिष देशमुख व रेस क्रॉस इंडिया स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करणारे विपीन नाईक यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
वार्षिक स्पोर्ट डे कार्यक्रमा दरम्यान वेगवेगळ्या मॉडेलची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती शिवाय मॉडेल लेझीम, योगा, डम्पबेल्स, एरोबिक्स, नृत्य, ओढणी डान्स आदि सादर करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन वेदिका ढगे शबिना मन्सूरी यांनी केले तर आभार जवेरिया शेख यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here