Home शैक्षणिक जवाहर कन्या विद्यालय सावनेरची विद्यार्थिनी तालुक्यातून अव्वल

जवाहर कन्या विद्यालय सावनेरची विद्यार्थिनी तालुक्यातून अव्वल

2
0

विद्या प्रसारक मंडळ सावनेर द्वारा संचालित जवाहर कन्या विद्यालय सावनेर येथील विद्यार्थिनींनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2026 मध्ये उज्वल यश संपादन केले.नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2026 शाळेचा निकाल 84.26% लागलेला आहे.
याप्रसंगी खालील गुणवंत विद्यार्थिनींनी शाळेचे नावलौकिक केलेले आहे.
1) तनुश्री डाहाके 95.40%
2) प्रतिज्ञा देशभ्रतार 84.40%
3) पारूल गजभिये 82.40%
4) अंजली पटे 81.80%
5) तोशिका जीवतोडे 81.20%
6) समीक्षा गौरखेडे 80.60%
7) प्रिन्सी पाटील 80.20%
कु. तनुश्री यशपाल डाहाके हिने 95.40% गुण मिळवून तालुक्यातून सेमी इंग्रजी माध्यमातून प्रथम क्रमांक मिळविला .
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.विजय डाहाके,संस्थेचे सचिव नरेंद्र डाहाके,संस्थेचे उपाध्यक्ष एम.व्ही. डाहाके तसेच संस्थेच्या सदस्या विना डाहाके सदस्य यशपाल डाहाके ,राहुल डाहाके,स्वप्निल डाहाके,सोनालि डाहाके,डॉ.ऐश्वर्या डाहाके मॅडम व मुख्याध्यापिका सरोज अटाळकर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून कौतुक केले व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here