Home जागरुकता मौदा उड्डाणपुलाचे नामकरण आणि टोल प्लाझाच्या समस्येवर तात्काळ कारवाईचे आश्वासन!

मौदा उड्डाणपुलाचे नामकरण आणि टोल प्लाझाच्या समस्येवर तात्काळ कारवाईचे आश्वासन!

56
0

मौदा (तालुका प्रतिनिधी)
दिनांक २८ डिसेंबर २०२५ – नागपूर जिल्ह्यातील मौदा शहरातील रबडीवाला येथील उड्डाणपुलाला महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी तसेच मौदा टोल प्लाझावर होणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या ट्रास आणि टोल शुल्क कमी करण्याबाबतचे निवेदन केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांची विशेष भेट घेऊन माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह माजी जि. प. अध्यक्षा निशा सावरकर आणि मौदा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजाभाऊ तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी निवेदन स्वीकारले आणि त्यावर तात्काळ कार्यवाही करून योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला सर्व नगरसेवक, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबा जुमदेवजी हे नागपूर परिसरातील गरीब कुटुंबातील महान संत आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात, ज्यांनी मानव धर्माची स्थापना केली, त्यांच्या नावाने उड्डाणपुलाचे नामकरण झाल्यास स्थानिकांना अभिमान वाटेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
तसेच मौदा टोल प्लाझावरून शहर आणि तालुक्यातील नागरिकांना होणारा ट्रास कमी करण्यासाठी पास शुल्कात सूट किंवा इतर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसादामुळे मौदा शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ही भेट मौदा शहराच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, अशी अपेक्षा स्थानिक नेते आणि नागरिक व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here