गिरीश आंदे (तालुका प्रतिनिधी कळमेश्वर)
सावनेर येथील क्रीडा ग्राउंड सावनेर आज दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी उपविभाग अंतर्गत सावनेर कळमेश्वर पोलीस २०२५ एक धाव जागरूकतेसाठी या तत्त्वावर ग्रामीण नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सायबर क्राईम,महिला विरुद्ध करणारी गुन्हे, डायल ११२, डायल १९३०, रस्ते सुरक्षा, पोलीस काका, पोलीस दीदी, नशा मुक्ती,नवीन कायद्याचे ज्ञान प्राप्त व्हावे तसेच लहान मुला मुलींमध्ये जवळचे वाटावेत या अनुषंगाने आज मॅरेथॉन घेण्यात आली आहे.
सदर स्पर्धेमध्ये १) ३ कि.मी.१३ वर्ष वर्ष वयोगटापर्यंत मुला मध्ये प्रथम हर्ष ढोबळे ७००० रू,दुसरा लक्ष पटेल ५००० रू,तिसरा नैतिक बगमार ४००० रू तसेच मुलीमध्ये प्रथम श्रावणी लसंते ७०००रू, दुसरी गार्गी सत्कार ५०००रू, तिसरी जानवी कातरमल ४००० रू
२)३ कि.मी.५० वर्ष व त्यावरील प्रथम घनश्याम पद्मगिरवार ७०००रू, दुसरे चंदू भोंगाडे ५००० रू, तिसरे नागोराव भोयर ४००० रू तसेच महिला श्रीमती शारदा भोयर ७००० रू
३)५ की.मी.१४ वर्ष व १७ वर्षापर्यंत पहिले प्रणय उपासे ११०००रू, दुसरे प्रदुण्य खोडे ७००० रू, तिसरे आदित्य नागेश्वर ५०००रू, तसेच मुली जानवी बावणे ११०००रू,दुसरी हिमांशी बावणे ७०००रू, तिसरी मानसी काठोके५०००रू
४)१० कि.मी.१८वर्ष व त्यावरील पुरुष प्रथम राजन यादव२१०००रू, दुसरे सौरव तिवारी १५०००रू, तिसरे कुणाल वाघ १००००रू तसेच महिला प्रथम प्राजक्ता गोडबोले २१०००रू, दुसरी रिया धोतरे १५०००रू, तिसरी मिताली भोयर १००००रू याप्रमाणे स्पर्धकांना रोख पारितोषिक देण्यात आले.सदर स्पर्धा ही जनजागृती करण्यासाठी घेण्यात आली असून ग्राउंड मध्ये जागृतीसाठी फ्लॅग लावण्यात आले होते. त्यावेळी सावनेर कळमेश्वर केळवद खापा परिसरातील खेळाडूं व नागरिक सदर स्पर्धेत भाग घेण्यास व पाहण्यास आले होते.
स्पर्धेच्या उद्घाटनास मा.आशिष देशमुख (आमदार सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र),मा रमेश धुमाळ (अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण),मा.एस.आर,भरड(दिवाणी न्यायधीश सावनेर), मा.एस.के. सरदार (दिवाणी न्यायधीश वरिष्ठ स्तर सावनेर) मा.एन.व्ही.रणधिर (न्यायाधीश सावनेर),मा.आर.एल.राठोड (न्यायाधीश कळमेश्वर),मा.पूजा गायकवाड (पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण),मा.रविंद मानकर (पोलीस निरिक्षक सायबर सेल) अजय मानकर (वेलफेअर शाखा)ओमप्रकाश कोकाटे (गुन्हे शाखा ) इत्यादी उपस्थित मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी मा.अनिल मस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग व उमेश पाटील पोलीस निरीक्षक सावनेर, मनोज काळबांडे पोलीस निरीक्षक कळमेश्वर, विशाल गिरी पोलीस निरीक्षक खापा,अनिल राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक केळवद यांच्या उपस्थिती मध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.




