गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील कळंबी येथील रहिवासी रमेश लोणारे यांच्या घरी दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी पहाटे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. या घटनेनंतर भारत गॅस एजन्सी, ब्राम्हणी यांनी ग्राहकास नवीन सिलेंडर देण्यास नकार देत नवीन कनेक्शन घेण्यास भाग पाडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
या अन्यायाविरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नागपूर जिल्हा प्रमुख उत्तम भाऊ कापसे यांच्या नेतृत्वाखाली व मंगेश भाऊ गमे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी भारत गॅस एजन्सी, ब्राम्हणी कार्यालयासमोर जोरदार मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनात प्रशांत भाऊ कामोने (युवासेना सावनेर तालुका प्रमुख), सुमित भाऊ गमे, अनुग्रह तिडके, विकास बागडे, गौरव घोडे, आशिष ठाकरे, धीरज बोडे, ललित डेहरिया, सतीश वानखेडे, अमोल गाठीबांधे, प्रणित धवड, जितेंद्र दडमल, रोहित लोणारे, सौरभ भोयर, सूरज पाटील व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अखेर एजन्सी प्रशासनाने नमते घेत पीडित रमेश लोणारे यांना तात्काळ नवीन गॅस सिलेंडर वितरित केला.
या यशस्वी आंदोलनाबद्दल शिवसेना कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असून, अशा अन्यायग्रस्त ग्राहकांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.




