Home Breaking News तेलगावचे सरपंच शरद ढोके यांची आमदार डॉ.आशिष देशमुख यांना दिवाळी सदिच्छा भेट

तेलगावचे सरपंच शरद ढोके यांची आमदार डॉ.आशिष देशमुख यांना दिवाळी सदिच्छा भेट

113
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
ग्रामपंचायत तेलगाव (ता. सावनेर) येथील सरपंच शरद ढोके यांनी दिवाळीच्या निमित्ताने आमदार डॉ. आशिष देशमुख यांना नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान ग्रामविकास, नागरिकांच्या अडचणी आणि गावातील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सरपंच ढोके यांनी ग्रामपंचायतीच्या आगामी योजना आणि विकासात्मक मागण्या आमदार देशमुख यांच्या समोर मांडल्या. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. तसेच, ग्रामविकासासाठी आवश्यक निधी आणि प्रशासकीय सहकार्य मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here