Home आवास योजना सावनेरचे वारकरी निघाले टापरे महाराजांच्या दिंडीत विठुरायाच्या दर्शनाला

सावनेरचे वारकरी निघाले टापरे महाराजांच्या दिंडीत विठुरायाच्या दर्शनाला

76
0

सावनेर
आषाढी वारी निमित्त पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी गेल्या तीन वर्षापासून येथील त्र्यंबकेश्वर नागदार स्वामी महादेव मंदिरातून अशोक उमाटे व गावंडे महाराजांच्या पुढाकारात मोठ्या संख्येने वारकरी विठुरायाच्या जयघोषात आळंदीला प्रस्थान करतात येथील पालखी सोहळ्याचे दर्शन घेऊन टापरे महाराजांच्या दिंडीत सहभागी होतात विठ्ठलाच्या गजरात पंढरीला निघतात यंदाही येथील विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेला ८० ते ९० विठ्ठल भक्तांचा जत्था आळंदी येथे पोहचून दोन दिवस मुक्कामी होता यावेळी अशोक उमाटे महाजन यांनी येथील धर्मशाळेत भोजनदान व भेटवस्तू देऊन आपल्या सेवा कार्याचा परिचय दिला सोबतच्या इतर वारकऱ्यांनीही सेवेसाठी हातभार लावला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले या ठिकाणावरून पंढरपूर करिता निघणाऱ्या अनेक दिंड्यांमधील एक टापरे महाराजांच्या दिंडीत विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here