गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
माननीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, माननीय पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून आज दि.03/02/2025 सोमवार ला शिवसेना उबाठा नागपूर जिल्हा प्रमुख मा.उत्तम भाऊ कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असलेले युवा तडफदार नेतृत्व असलेले मंगेश भाऊ गमे यांच्या कार्याला प्रेरित होऊन कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी गावातील शेकडो नवयुकांनी व महिलांनी शिवसेना ऊ.बा.ठा पक्षामध्ये प्रवेश केला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत लाभलेले उत्तम भाऊ कापसे यांनी नव्याने तयार झालेल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन केले व शिवसेना पक्षबांधणी साठी प्रेरित केले तसेच लागेल ती मदत लागेल त्या ठिकाणी कोणत्याही वेळेला नेहमीच उपलब्ध राहू अशी ग्वाही दिली व मंगेश भाऊ गमे यांनी सुद्धा सर्वांना संबोधित करून तेलकामठी या गावातून पक्षबांधणी ला सुरुवात केली.
Home प्रक्ष प्रवेश तेलकामठी गावातील शेकडो नवयुकांनी व महिलांनी केला शिवसेना ऊ.बा.ठा पक्षामध्ये प्रवेश