नागपुर जिल्हयात उच्च मध्यमिक प्रमाणपत्र (परीक्षा इयत्ता १२) वी दिनांक ११/०२/२०२५ ते दिनांक १८/०३/२०२५ या कालावधीत तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) ही दिनांक २१/०२/२०२५ ते दिनांक १७/०३/२०२५ या कालावधीत आहे. मा. श्री हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामिण जिल्हा यांचे मार्गदर्शनाखाली नागपुर ग्रामीण जिल्हयात परीक्षा केद्रांवर व परीसरात योग्य बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोणत्याही परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच गैरप्रकार होवु नये या करीता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचे भारतीय नागरी सुरक्षा संहीता २०२३ चे कलम १६३ अन्वये मनाई आदेश पारीत झालेला असुन त्याचे उल्लंघन होणार नाही याकरीता परीक्षा केंद्राचे १०० मीटर परीसरात लोकांची गर्दी होवु नये म्हणुन २ पोलीस अंमलदार नेमण्यात येत असुन महत्त्वाचे विषय जसे इंग्रजी, गणित, विज्ञान या सारखे विषयाच्या परीक्षांच्या दिवशी १०० मीटर मध्ये ३ पोलीस अंमलदार नेमण्यात येणार आहे. या व्यतीरीक्त परीक्षा केंद्रामध्ये अतिरीक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच ज्या परीक्षा केद्रांवर समुहीक कॉपी होण्याचे प्रमाण आहे तेथे अतिरीक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स तसेच एसटीडी बुथ यावर सुध्दा लक्ष ठेवले जात असुन आदेशाने उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. सर्व उपविभागिय पोलीस अधिकारी आणि सर्व ठाणे प्रभारी अधिकारी हे सतत परीक्षा केंद्राना भेट देत आहे. आज दिनांक १२/०२/२०२५ रोजी मा. श्री हर्ष ए. पोद्दार पोलीस अधिक्षक,नागपुर ग्रामिण जिल्हा आणि श्री अनिल म्हस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांनी सावनेर शहरातील बारावीचे तीन परीक्षा केंद्र १) डॉ हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालय २) भालेराव कनिष्ठ महाविद्यालय, आणि ३) मॉर्निंग स्टार जुनियर कॉलेज येथे भेट देऊन परीक्षा केंद्राची पाहणी केली आणि योग्य सुचना दिल्या आहे.




