Home समस्या सावनेर ” सेफ सिटी प्रोजेक्ट ” ला मंजुरी

सावनेर ” सेफ सिटी प्रोजेक्ट ” ला मंजुरी

85
0

आता संपुर्ण सावनेर शहरात येणार सीसीटीव्ही आणि आर्टीफीशीयल इंटीलीजन्स (ए आय) यंत्रणेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हे निर्बंध आणि उघडकीस आणण्यास “फोर्स मल्टीप्लायर” ची मदत होईल. बरेच दिवसापासुन प्रलंबित असलेले सीसीटीव्ही यंत्रणेस जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांचे कडुन सर्वसाधारण जिल्हा वार्षीक योजना सन 2024 2025 योजने अंतर्गत प्रशासकीय मान्यता दि. 12/02/2025 रोजी मिळाली आहे. सदर योजने करीता 02 कोटी रुपये मंजुर झाले असुन लवकरच सावनेर शहरात अद्यावत सीसीटीव्ही यंत्रणेचे काम सुरु होणार आहे.
सावनेर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असुन त्या तुलनेत पोलीस स्टेशनला मणुष्यबळ कमी असल्यामुळे सीमा लगत मध्यप्रदेश राज्याचा भोपाल राष्ट्रीय महामार्ग, नागपुर छिंदवाडा राष्ट्रीय महामार्गच्या सीमा लागुन असल्यामुळे सावनेर शहरातील अपघातांचे गुन्ह्यात तसेच घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. मध्यप्रदेश येथील गुन्हेगार सावनेर शहरात प्रवेश करुन चोरी, घरफोडी, मो.सा. चोरी, गोवंश तस्करी, तंबाखु तस्करी, दुखापतीचे गुन्हे करुन राष्ट्रीय महामार्गाने पळुन जातात. त्याकरीता संवेदनशिल स्थळे चिन्हांकीत करुन गुन्हेगारीला आळा बसावा या करीता तसेच सीसीटीव्ही मुळे “फोर्स मल्टीप्लायर” म्हणुन आधुनिक तंत्रज्ञान वापरता येवुन गुन्हे उघडकीस आणण्यास मदत होईल. सावनेर शहरात एकुण 25 ठिकाणी 99 कॅमेरे Atomatic number plate ricognition (ANPR) व ए आय वर आधारीत कॅमेरे लावण्यात येणार आहे. प्रस्तावित योजनेस मंजुरी मिळण्या करीता मा. श्री आशिष देशमुख आमदार सावनेर विधानसभा क्षेत्र व मा. श्री हर्ष पोद्दार पोलिस अधिक्षक साहेब नागपूर जिल्हा ग्रामीण नागपूर, मा.श्री रमेश धुमाळ अपर पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामीण व मा. श्री अनिल म्हस्के सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे प्रयत्नांनी सीसीटीव्ही योजनेस मंजुरी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here