गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील ” नांदीखेडा (तिष्टी खुर्द) येथील पाणीटंचाईची समस्या प्रमाणे अनेक ग्रामपंचायती मधील पाणीटंचाईच्या समस्या “इंडिया लाईव्ह तेज न्यूज” मध्ये वारंवार लावून धरल्याने व अशा प्रकारच्या अनेक मूलभूत समस्या पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वारंवार समोर येऊ नये यासंदर्भात गटविकास अधिकारी कोण कोणती ठोस पावले उचलतात यासाठी नेहमीप्रमाणे नागरिक प्रतीक्षेत असल्याची मथळ्याखाली न्यूज लावून धरल्यामुळे ” अखेर कळमेश्वर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. व्यापक प्रमाणात लोकांचा सहभाग यामध्ये वाढावा. ग्रामस्थांनी पाण्याचे महत्त्व ओळखून पाणी हेच जीवन आहे, त्याच्या वापराचे योग्य नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी केले.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. ग्रामपंचायत स्तरावर लोकांना पुरेसे पाणी उपलब्ध होणे कठीण होत चालले आहे. तालुक्यात एकूण ५० ग्रामपंचायती असून, त्या अनुषंगाने तालुक्यात कुठेही पाणीटंचाई भासणार नाही, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश ग्रामपंचायत अधिकारी यांना देण्यात आले आहेत. तसेच पाणीटंचाई बाबत वारंवार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची आढावा सभा होत असून, याबाबत योग्य त्या उपाययोजनाबाबत निर्देश देण्यात येत आहेत.
ग्रामपंचायत स्तरावर अस्तित्वात असलेले स्त्रोताची पाण्याची पातळी कमी होत असून, आवश्यकता भासल्यास इतर स्त्रोत अधिग्रहित करण्याचे निर्देशही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. गावकऱ्यांनी जर पाण्याचा जपून वापर केला तर, तालुक्यात कुठेही पाणीटंचाई भासणार नाही आणि तालुक्यात कुठेही टँकरची आवश्यकता पडणार नाही. तसेच गावात निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठाच करण्याबाबत, तसेच ग्रामपंचायत स्तरावर पाईप लाईनला लिकेज आढळून आला किवा व्हॉल्व गळती आढळून आली, तर ती त्वरित दुरुस्त करून घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस देण्यात आल्या आहेत. गावातील नागरिकांना ५५ लिटर प्रती मानसी पाणी मिळण्याबाबत प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले, अशी माहिती गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहेत.
Home समस्या पाणीटंचाईची समस्या उघड्यावर आल्याने गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी काढले प्रसिद्धी पत्रक




