Home Breaking News पाटणसावंगी टोल नाका येथे आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनाला आले...

पाटणसावंगी टोल नाका येथे आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनाला आले यश

68
0

सावनेर
आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात्त झालेल्या प्रभावी आंदोलनानंतर पाटणसावंगी येथील टोल नाका अखेर २९ जुलैपर्यंत बंद होणार असून, तो पांढुर्णा रोडवरील भागेमहारी येथे स्थलांतरित करप्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार व दररोज टोल भरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सावनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी नागरिकांना टोल हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा करून भागेमहारी येथे नवीन टोलची उभारणी सुरू झाली, मात्र कामाची गती आणि टोल स्थलांतराच्या तारखा वारंवार बदलल्याने जनतेचा संयम सुटला.२७ जुलै रोजी टोल स्थानकावर आमदार डॉ. आशिष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकत्र्यांसह आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्यावर एक तास बाहतु‌क ठाम झाली होती. यावेळी प्रोजेक्ट डायरेक्टर सी.एम. सिन्हा, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल म्हस्के, उमेश पाटील आदी उपस्थित होते. सिन्हा यांनी २९ जुलै रोजी टोल बंद करून स्थलांतराची घोषणा करताच आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलन स्थळी भाजपचे किशोर चौधरी, अॅड. अरविंद लोधी, बबलू ठाकूर, सुरेंद्र शेंडे, मंदार मंगळे, दिगंबर सुरतकर, सुमित तिडके, गणेश कुहोकर, राजेश निंबाळकर आदीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. डॉ. राजीव पोतदार आणि मनोहर कुंभारे यांनी या निर्णयाचे स्वागत करत आंदोलनाच्या यशस्वीतेवर समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here