गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
आज दिनांक 27 जून 2025 रोजी सावनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयात आमदार डॉ.आशीषराव देशमुख यांच्या पुढाकाराने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या दरबारात मतदारसंघातील नागरिकांनी विविध समस्यांचे निवेदन लेखी स्वरूपात सादर केले.
आमदार डॉ.आशीषराव देशमुख यांनी या तक्रारी थेट संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आणि तात्काळ उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या जनता दरबारात 500 हून अधिक तक्रारींचे निवारण करण्यात आले.
नागरिकांशी संवाद साधताना आमदार देशमुख म्हणाले, “जनतेची सेवा हीच माझी प्राथमिकता असून, प्रत्येक नागरिकांची अडचण ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे.”
या कार्यक्रमास राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये राजीव पोतदार, अरविंद लोधी, मनोहर कुंभारे, ज्ञानेश्वर गुडदे, उपविभागीय अधिकारी श्री. संपत खलाटे, तहसीलदार श्री. रविंद्र होळी (सावनेर), श्री. रोशन मकवाने (कळमेश्वर), पंकज भोंगाडे, आयुष लोधी, महेश चकोले, प्रमोद हत्ती, प्रतीक कोल्हे, पिंटू सातपुते, पवन जामदार आणि विलास ठाकरे यांचा समावेश होता.
Home Breaking News उपविभागीय अधिकारी कार्यालय सावनेर येथे आमदार डॉ.आशीषराव देशमुख यांच्या उपस्थितीत जनता दरबार...




