Home Breaking News स्नेहमिलन सोहळ्यामुळे झाली 13 वर्षानंतर डॉ.हरीभाऊ आदमने येथे शिकत असलेल्या कॉलेजचे मित्राची...

स्नेहमिलन सोहळ्यामुळे झाली 13 वर्षानंतर डॉ.हरीभाऊ आदमने येथे शिकत असलेल्या कॉलेजचे मित्राची भेट

191
0

सावनेर
विद्यालयाचे दिवस संपले की प्रत्येकजण आपल्या
करियरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो मात्र ज्या विद्यालयात आपण शिकलो, घडलो, वेगवेगळ्या
भागातील विद्यार्थ्याबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले,
ती नाळ मात्र ‘तशीच असते. पुन्हा एकदा भेटावे, सर्वासोबत हितगुज करावे असे सर्वानाच वाटते. पण प्रत्येकजणच आपआपल्या नोकरी-धंद्यात, संसारात व्यस्त असल्यामुळे ते सहजासहजी शक्य होत नाही.
मात्र अशक्यही नसते, ज्या विद्यालयात आपण घडलो
आयुष्य जगण्याचे तंत्र-मंत्र मिळाले, त्या
विद्यालयातील पुन्हा एकदा त्याच विद्यार्थीं मित्र-
मैत्रिणीं सोबत पुन्हा 13 वर्षानंतर भेटण्याची संधी
चालून आली. ती म्हणजे या स्नेह मिलन सोहळ्यामुळे स्नेहमिलन सोहळातून 13 वर्षानंतर कॉलेज मित्राची भेट…!!
गेल्या सात वर्षापासून सातत्याने आपल्या कॉलेज मित्रांची भेट व्हावी जुने दिवस जुने बालपण पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर दिसावं यासाठी 13 मार्च 2017 रोजी मिथुन उईके यांनी व्हाट्सअप ग्रुप तयार करून या कॉलेज मित्रांनी विखुरलेल्या मित्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पाच दहा जवळील मित्र जोडले हळूहळू मित्रांची संख्या वाढत गेली आणि आज तारखेत तब्बल 48 कॉलेज मित्र मैत्रिणीचा व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले..
2010/2012 ची कॉलेज बॅच डॉ हरिभाऊ आदमने कॉलेज
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला जुने मित्र पुन्हा एकदा भेटले! या भेटीने सर्वांना खूप आनंद झाला.अनेक वर्षांनंतर भेटल्याने, त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि नवीन मैत्रीचे नातं अधिक घट्ट झाले.
आयुष्याचा धावपळीत मागे राहिलेले क्षण पुन्हा एकदा जिवंत झाले. तब्बल 13 वर्षानंतर कॉलेज मित्र मैत्रिणी एकत्र आल्याने
सावनेर शहरातील डॉ हरिभाऊ आदमने येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात कॉलेज मित्र-मैत्रिणी
जवळपास 40 ते 50 या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.2010/2012 च्या बॅचमधील हे विद्यार्थी अनेक वर्षांनंतर एकमेकांना भेटल्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बदललेल्या वर्षातील आपल्या मित्र-मैत्रिणींना पाहून अनेकांना क्षणभर ओळखणेही कठीण झाले,
पण हास्याच्या आणि गप्पांच्या ओघात सारे क्षणार्धात पुन्हा कॉलेज दिवसांमध्ये रमले.या स्नेहमेळाव्यात कॉलेज जीवनातील अनेक मजेदार किस्से आणि आठवणींना उजाळा देण्यात आला.कुणी शिक्षकांच्या सवयींचे अनुकरण केले,तर कुणी
कॉलेजमधील गमतीजमती सांगून हशा पिकवला. तर संगीत खुर्ची सह अनेक खेळ, डान्स, संगीत खेळले तसेच अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांनी एकमेकांच्या कुटुंबाची आणि
आतापर्यतच्या प्रवासाची माहिती घेतली. भूतकाळातील आठवणींच्या साथीने भविष्यातील भेटीगाठींचे नियोजनही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सदस्यांनी सांगितले की, “आजच्या धावपळीच्या जीवनात मित्र-मैत्रिणींना एकत्र आणणे हे एक मोठे आव्हान होते.पण,सगळ्यांच्या मनात असलेली ओढ आणि एकत्र येण्याची इच्छाशक्ती यामुळेच हा मेळावा यशस्वी झाला.इतक्या वर्षानंतरही त्याच उत्साहाने आणि प्रेमाने भेटणे हा अनुभव खूप आनंददायी होता.
हा स्नेहमेळावा केवळ एक भेट नव्हती, तर भूतकाळातील सुंदर आठवर्णीना उजाळा देत वर्तमानातील नात्यांना अधिक घट्ट करणारा दुवा ठरला. या भेटीने सर्वांना पुन्हा एकदा त्यांच्या कॉलेज जीवनातील सोनेरी दिवसांची आठवण करून दिली आणि ‘मैत्री या शब्दाचा खरा अर्थ पुन्हा एकदा अनुभवला.विनोद महाजन ,अनिल डहाके सर यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली. मान्यवर गुरुजनांचा येथो चित मानसन्मान पुढील वर्षी परत नव्या दमान भेटण्याचा संकल्प करीत एकमेकांचा निरोप घेतला हा स्नेहमिलन यशस्वी करण्यासाठी सर्व वर्गमित्रांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता अल्पोहारांनी करण्यात आली.हा मैत्रीबंध संमेलन जितका उत्साही व जोश पूर्ण होता तेवढाच भावनिक ठरला पुढील वर्षी परत नव्या दमान भेटण्याचा संकल्प करीत एकमेकांचा निरोप घेतला हा स्नेहमिलन यशस्वी करण्यासाठी सर्व वर्गमित्रांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता अल्पोहारांनी करण्यात आली.
यावेळी प्रा.अनिल डहाके प्रा.विनोद महाजन,हितेश बनसोड,स्वप्निल पारवे,राहुल बारई, पंकज गायधने, नाना जनबंधू, योगेश टोंगे, आशिष सोमकुवर,मिलिंद बोधे, संदीप सुरजुसे, अमित मेश्राम, विकास धुवाधपार, वसीम सहा, प्रमोद ताजने, दिनेश झेलगोंदे, सुरज सौदागर, रोशन गावंडे, रितू खोरगे, अश्विनी ठाकरे, मंजुषा सहारे,पदमा मरसकोल्हे, पपीता नारनवरे, प्रीती कापसे, प्रिया सोनेकर, रीना लांबट,शितल पलेरिया, सोनू मेहेत्रे,प्रगती चांदुरकर जया खापेकर ,जया तांदूळकर,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here