सावनेर शहरात 16 मार्च 2025 ला राम गणेश गडकरी नाट्य सभागृहात लोकरंग कलाश्रृंगार गृह सावनेर तर्फे ‘अस्तित्व – 2025’ महिलादिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महिलातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व विविध क्षेत्रात आपले जिवन समर्पित केलेल्या महिलांचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र सावनेर च्या संचालिका राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सुरेखा दीदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सोबतच विशेष अतिथी म्हणून ओम साई पब्लिक स्कूल च्या प्राचार्या सौ. हेमलता पांडे, सावनेर पब्लिक स्कूल च्या प्राचार्या सौ. ममता अग्रवाल व नृत्यांगना कुमारी प्रियांका मालूमकर, पत्रकार श्री. दिलीपजी घोरमारे व श्री. संतोषजी यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा ज्यामध्ये आरसा पेंटिंग व डेकोरेशन स्पर्धा आणि होळी थीम वेशभूषा व समूहनृत्य स्पर्धा घेण्यात आली सोबतच खेळ पैठणीचा आणि होळी विशेष खेळ व प्रस्तुती घेण्यात आल्या.
त्यामधे नृत्यअरंगम सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स च्या कु. आरोहि जांगडे,कु.परिणीता ठाकरे, कु. शामिली जांगडे
यांनी भरतनाट्यम नृत्य या शैलीत गणेश वंदना व देवी स्तुती तर सौ. तुलसी तलवारकर यांनी होळीगीत, कु. प्रियांका मामूलकर यांनी होळी आधारित लावणी नृत्य, तसेच लोकरंग महिला कलामंच च्या सौ. नमिता ईलमकर, सौ. संगीता डोंगरे, सौ. पायल सूर्यवंशी, सौ. कविता सूर्यवंशी, सौ. भारती जांगडे, सौ. ममता पवार यांनी समुह लोकनृत्याची विशेष प्रस्तुती दिली.
या वर्षीच्या लोकरंग कलाभूषण जीवनगौरव पुरस्काराने सत्कारमूर्ती राज योगिनी ब्रम्हाकुमारी सुरेखा दीदी यांना त्यांनी केलेल्या आध्यात्मिक जिवन प्रवासासाठी सन्मानित केले गेले.
सोबतच उपस्थित सर्व मान्यवरांचे व विशेष प्रस्तुतीकारांचे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
त्याबरोबर होळी विशेष वेशभूषा स्पर्धेत प्रथम वेदश्री देशपांडे व द्वितीय सोनम ठवरे, आरसा डेकोरेशन स्पर्धेत प्रथम बरखा कछवा व द्वितीय स्नेहल सातपुते तसेच समुह नृत्य स्पर्धेत प्रथम विष्णवे नमः ग्रुप च्या चंदा जिवतोडे, अनिता साबळे, योगिता आसोले,चित्रा कलंबे तर द्वितीय सपना दिवटे व पौर्णिमा गाडगे यांचा ग्रुप हे सर्व विजयी ठरले .
या वर्षीचा होळी स्पेशल खेळ पैठणीचा खेळाची विजेता मानकरी सौ. सपना मारोतकर ठरली.
सर्व सहभागी चे विशेष आभार मानत व आकर्षण बक्षीस देऊन तर विजेता हिचे पैठणी साडी व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम चे निवेदन सौ योगिता घोरमारे यांनी, आयोजन लोकरंग च्या मीनाक्षी गजभिये, सुवर्णा भगत,योगिता घोरमारे व श्री. आकाश बरवड यांनी केले.
कार्यक्रमाला श्रीमती गजाला आलम, संगीता ताई , नमिता ताई , पायल ताई, ममता ताई,नंदूभाऊ अंतूरकर, राजाभाऊ वैद्य, हिमांशू ईखार,पत्रकार दिलीप घोरमारे व दीपक राजगिरे यांचे सहकार्य लाभले.
Home सांस्कृतिक व सामाजिक लोकरंग कलाश्रृंगार गृह तर्फे ‘अस्तित्व – 2025’ महिलादिन कार्यक्रमाचे आयोजन




