गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
आज दिनांक १३ मे २०२५ रोजी भारतीय जनता पार्टीच्या ,महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा करण्यात आली. यामध्ये सावनेर विधानसभा क्षेत्रातील माजी जिल्हा परिषद सदस्य व भारतीय जनता पार्टीचे दमदार नेते श्री मनोहर कुंभारे यांची भारतीय जनता पार्टीच्या नागपूर ग्रामीण (काटोल)च्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे सावनेर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्ता मध्ये सुद्धा पंचवीस वर्षानंतर डॉ.आशिष देशमुख यांची भारतीय जनता पार्टीतून आमदारपदी निवड झाल्यापासून एक वेगळच बळ मिळाल असल्याचे दिसत आहे.तर सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनकडून प्रत्यक्ष भेट देऊन तसेच अनेक माध्यमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शुभेच्छाचा वर्षाव श्री.मनोहर कुंभारे यांच्यावर करण्यात येत आहे .