सावनेर येथे मागील 30 वर्षापासून रखडून पडलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती देण्याकरीता सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी सावनेर येथील स्थानिक ग्रामिण आरोग्य केंद्र येथे सुरू असलेल्या ट्रॉमा सेंटर बांधकामाच्या ठिकाणी ट्रॉमा सेंटर पुर्वी आवश्यक असलेल्या रुग्णांच्या सोईसाठी उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी पहाणी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रपाठक मंजूषा ढोबळे यांच्या हस्ते मा.आ.आशिष देशमुख यांचे पुच्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालय निर्मितीच्या संकल्पनेतून खाजगी डॉक्टर्स तसेच शासकीय अधिकारी यांच्यासोबत सभा चर्चा करण्यात आली. यावेळी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या द्वारे बाह्य रुग्ण विभाग आय.सी.यू.मध्ये जनरल फिजिशियन द्वारे किमान 100 खाटेची सर्व सोय, मेडिसिन विभागाची निर्मिती, स्त्रीरोग विभाग, बालरोग विभाग, मेडीसीन आयसीयू, हे विभाग चालू करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी लागणारे सर्व विशेषज्ञ डॉक्टर्सची नियुक्ती, नियमित विझीट गायनॅकॉलॉजिस्ट विभाग मध्ये बाहा रुग्ण विभाग तसेच डिलिव्हरीची सोय करून देणे, बाल रोग विभागांमध्ये आय.सी.यु. ची सोय करून नियमित बाल रोग तज्ञाची नियुक्ती करणे,सर्व विशेषज्ञ डॉक्टर्सची नियमित विजिट सुरू करणे, सिव्हिल हॉस्पिटल यांच्याद्वारे डिसेबिलिटी सिटी नागपूर ऐवजी सावनेर येथेच सोय उपलब्ध करून देणे ट्रॉमा सेंटरच्या इमारतीची पाहणी करून योग्य सल्ला देऊन खालील निर्देश देण्यात आले.
बांधकाम मैप रिवाईज करून वरील मजल्यावर जनरल वार्ड तयार करणे व्यवस्थित रित्या खर्चाची यादी तयार करून प्रपाठक द्वारे अधिष्ठाचा महोदय पर्यंत पोहोचविणे ट्रामा सेंटर सोबत इतर विभाग निर्मिती करण्याचे निर्देश जसे डायलिसिस युनिट तीन अँम्बुलन्स ब्लड बैंक एक्स-रे या सर्व सोयी 24 तास पोहचविणे नवीन डॉक्टर्सची नियुक्ती करून त्यांच्या ड्यूटी व्यवस्थित रित्या लावणे खाजगी डॉक्टर्सला परवाने घेण्यात येणाऱ्या अडचणीमध्ये मदती करिता सिविल सर्जन महोदय यांना सूचना करण्यात आल्या यावेळी प्रमुख अतिथी डॉ. राजीव पोतदार डॉ. राज गजभिये (मा.अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर) मा. शंभरकर (उपसंचालक नागपूर मंडळ आरोग्य सेवा नागपूर) मा.संपत खलाटे (उपविभागीय अधिकारी सावनेर), मा. जिल्हा शल्य चिकित्सक सर्वोच्च रुग्णालय नागपूर डॉक्टर राठोड मा. जिल्हा आरोग्य अधिकारी नागपूर अन्य प्रभात प्रमुख आरोग्य पथक सावनेर, सुनीलकुमार दमाहे (अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग) डॉ. मंजुषा ढोबळे ॲड.अरविंद लोधी, ॲड.शैलेश जैन, नितीन कमाले, रामराव मोवाडे,मंदार मंगळे,तुषार उमाटे,मनोहर कुंभारे,सुजीत बागडे,महेश चकोले,आयुष लोधी,पिंटू सातपुते,डॉ.संदीप गुजर,डॉ.विजय घटे, डॉ.अशोक घटे,डॉ.चंद्रकांत मानकर,डॉ.संजय दोरखंडे,डॉ.प्रशांत राजपूत,डॉ.छत्रपती मानापुरे,डॉ.नितीन पोटोडे,डॉ.प्रशांत घोळसे,डॉ.प्रीतम निचड,डॉ.स्वप्निल काळे,डॉ.विलास मानकर,डॉ.उमेश जीवतोडे,डॉ.निलेश कुंभारे,डॉ.रोशन निनावे,डॉ.अनुप जैस्वाल,डॉ.शिवम पुण्यानी,डॉ.अमित बाहेती,डॉ.आशिष चांडक,डॉ.रवी ढवळे,डॉ.गिरीश लाकडे,डॉ.रश्मी भगत,डॉ.वृषाली जयस्वाल,डॉ.राजेंद्र मालापुरे,डॉ.विनोद बोबडे,डॉ.कृष्णाराव भगत,डॉ.ज्योत्सना घोटे, डॉ.दादाराव लुटे,डॉ.मनोहर काळे,डॉ.मर्फी गजभीये उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन डॉ. राहुल दाते व अतुल पारधी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रपाठक डॉ.मंजुषा ढोबळे यांनी केले.




