दिनांक १०/११/२०२५ रोजी केळवद पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, मध्यप्रदेश राज्यातुन तिष्टी मार्गे तेलगाव कडे टिप्परमध्ये अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी तिष्टी बु. बस स्टॉप जवळ नाकाबंदी केली असता टिप्पर कं एम.एच ४० बी.एल ०५०२ हे सावरगाव कडुन येताना दिसले. वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता त्याने वाहन न थांबविता काही अंतरावर वाहन घेवुन गेला आणि अंधाराचा फायदा घेत वाहन जागीच सोडुन पळुन गेला. पंचासमक्ष पोलीसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली तसेच एक किपॅड मोबाईल मिळुन आला. पोलीसांनी पंचासमक्ष १) टिप्पर कं एम. एच ४० बी.एल ०५०२ किंमती ३०,००,०००/- रूपये २) ६ ब्रास रेती किंमती ६०,०००/- रूपये आणि एक किपॅड मोबाईल किंमती ३,०००/- रूपये असा एकुण ३०,६३,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
टिप्पर कं एम.एच ४० बी.एल ०५०२ चा चालक आणि मालक याच्या विरूध्द पोस्टे केळवद येथे कलम ३०३ (२) भा.न्या. सं सहकलम ४८ (७), ४८ (८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Home अपराध अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद केळवद पोलीसांची कामगिरी




