Home अपराध केळवद पोलीस, लोधीखेडा पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग, मध्य प्रदेश यांची अवैधरित्या...

केळवद पोलीस, लोधीखेडा पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग, मध्य प्रदेश यांची अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणा-यां आरोपीतांवर केली संयुक्तीक कारवाई

26
0

मध्यप्रदेश राज्यात सिमेवरील काही गावांमध्ये अवैधरित्या मोहाफुल गावठी हातभट्टीची दारु काढुन सदर दारू महाराष्ट्र राज्यात पुरवली जाते. त्याअनुषंगाने दिनांक ११/११/२०२५ रोजी मा. श्री हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात केळवद पोलीस यांनी लोधीखेडा पोलीस आणि उत्पादन शुक्ल विभाग, मध्य प्रदेश यांच्यासह संयुक्तीक कारवाई करत महाराष्ट्र सिमेवरील जटामखोरा आणि मध्यप्रदेश सिमेवरील वडोना येथील अवैधरित्या मोहाफुल गावठी हातभट्टीची दारु काढणाऱ्या आरोपीतांवर कारवाई केली असता वडोना येथे एकुण ३००० लिटर मोहाफुल सडवा आणि ६० लिटर मोहाफुल दारू असा मुददेमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला आहे. आरोपी यांचे विरुध्द पोस्टे लोधीखेडा येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here