Home अपराध अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद. कळमेश्वर पोलीसांची कामगिरी

अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद. कळमेश्वर पोलीसांची कामगिरी

55
0

दिनांक १०/११/२०२५ रोजी कळमेश्वर पोलीसांना गुप्तबातमीदारांमार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की दहेगाव शिवार येथे काही इसम ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन धाड टाकली असता आरोपी नामे १) राम बाबपुलाल सिंग, वय ३० वर्ष, रा. दहेगाव, २) मुकेश शैलेन्द गजभिये, वय ३५ वर्ष, रा. रघपुती नगर, वाडी, नागपुर ३) विजय बळीराम गायधने, वय ४९ वर्ष, रा नवनीतनगर, वाडी, नागपुर, ४) प्रशांत मधुकरराव गोमासे, वय ३४ वर्ष, रा. रघुपती नगर, वाडी ५) अमोल विश्वास कापसे, वय ३९ वर्ष, रा. नालंदा जयताळा, नागपुर हे ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळतांना जागीच मिळुन आले. आरोपीतांच्या ताब्यातुन ५२ तास पत्ते, रोख रक्कम ३,६२०/- रूपये, ४ अँन्ड्राईड मोबाईल किमंती ३०,०००/- रूपये तसेच ६ दुचाकी वाहने १) होन्डा अॅक्टीव्हा क एम.एच ३१ एफ. वाय ४९२२, २) होन्डा अॅक्टीव्हा क एम.एच. ४० बी. क्यु. ००५०, ३) मोटर सायकल क एम. एच ३१ ई.टी. ७८७४, ४) मोटर सायकल क एम.एच ४९ बी.जे ८२९४, ५) होन्डा प्लेजर क एम.एच ४० होड २४१५, ६) अॅक्टीव्हा क एम. एच ४० सी. आर ३४७५ किंमती ३,५५,०००/- रूपये असा एकुण ३,८८,६२०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे १२ म जुका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here