नागपूर
दि.२३ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे रवीभवन येथे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार व राज्य सरचिटणीस संजय शेंडे यांच्या निरीक्षणात तर जगजीत सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचा प्रेरणा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.सुरुवातीला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना अभिवादन करण्यात आले, इतिहास तज्ञ दिवंगत प्रा.मा. म. देशमुख यांच्या प्रतिमेला सामुहिक आदरांजली वाहण्यात आली. प्रेरणा मेळाव्याची सुरुवात संविधान प्रस्ताविकेच्या वाचनाने व चळवळीच्या गीत गायनाने करण्यात आली.
प्रास्ताविकपर मांडणीत मागील दोन वर्षांतील कामाचा आलेख गौरव आळणे यांनी मांडला.जिल्हा कार्यकारिणीची निवड प्रक्रिया सूचना, जबाबदारी, राज्य निरीक्षक म्हणून संजय शेंडे व गजेंद्र सुरकार यांनी पार पाडली.संमती पत्रक/ स्वेच्छ शिफारस फॉर्म संकलन व सखोल छाननीअंती लोकशाही सहमतीने नवनिर्वाचित विभागनिहाय कार्यवाह ची घोषणा करण्यात आली. अध्यक्ष पदावर जगजीत सिंग तर उपाध्यक्ष म्हणून मधुकर धंदरे, सेवकराम राऊत व अशोक खोरगडे यांच्या नियुक्त्या झाल्यात. कार्याध्यक्ष पदी गौरव आळणे तर प्रधान सचिव पदी विनोद उलीपवार यांच्या फेर नियुक्त्या झाल्यात. इतर विभाग-बुवाबाजी संघर्ष विभाग विजय मोकाशी, वैज्ञानिक जाणिवा शि.प्रशिक्षण विभाग बबन द्रवेकर, महिला सहभाग विभाग प्रतिभा खोब्रागडे, युवा सहभाग विभाग मनिष अडागळे, जो.वि.नि. डॉ. कविता मते, आंतरजातीय /धर्मीय विवाह पृथ्वीराज शाम, मानसिक आरोग्य व्यवस्थापन माधुरी बारमासे, सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग कार्यवाह मालती व-हाडे, सहकार्यवाह मनोहर कापसे, सोशल मीडिया व्यवस्थापन संजय भलमे, व्यसन प्रबोधन विभाग अशोक पाटील, संविधान जागर विभाग कार्यवाह शरद वानखेडे, सहकार्यवाह रवींद्र राऊत आदींच्या नावाची घोषणा करण्यात आली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जगजीत सिंग यांनी पुढील काळात विवेकी विचार जनमानसात रुजविण्याची व प्रबोधन करण्याची अधिक गरज असल्याचे मत व्यक्त केले.प्रेरणा मेळाव्याला प्रज्वला तट्टे, अनिता भुरे, संजय भुरे, चंद्रशेखर पाटील, राम मस्के, आसू सक्सेना, सुधाताई बामनपल्लीवार, जयश्री देशमुख, कमलाकर देशमुख, जगदीश वाडीभस्मे, अनिल डोंगरे, ज्योतिराव लढके, सुधाकर धुर्वे, संजय लाडे, संजय गोडघाटे, रवी मेश्राम, अरुंधती मेश्राम, केशव मानव उलारे, राहुल चोरे, निखिल पुरी, विश्वास पित्तुलवार , केशव डोंगरे व राम मस्के इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. कविता मते यांनी केले तर आभार महिला सहभाग कार्यवाह प्रतिभा खोब्रागडे यांनी मानले. हम होंगे कामयाब.. या गीताने मेळाव्याचा समारोप करण्यात आला.




