गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर एमआयडीसी अंतर्गत वाहणाऱ्या दूषित पाण्याच्या प्रवाहाविरोधात शुक्रवार दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी एमआयडीसी रोड, कळमेश्वर येथे एकदिवसीय जनआंदोलन करण्यात आले. औद्योगिक सांडपाण्यामुळे परिसरातील शेतजमीन, जलस्रोत व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.
या आंदोलनाचे नेतृत्व वरोडा येथील सरपंच संगीता वासनिक, शिवसेना तालुका प्रमुख ब्रिजलाल रघुवंशी, सावडीचे सरपंच प्रवीण राऊत, झुणकीचे सरपंच विनोद राऊत, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल फुलारे, सामाजिक कार्यकर्ते वैभव घोंगे व प्रिया मानकर (पटले) यांनी केले.
आंदोलनस्थळी खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार आशिष देशमुख, तहसीलदार विकास बिक्कड व एमआयडीसी अधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. दूषित पाणी प्रवाह रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील तसेच प्रमुख मागण्या मान्य केल्या जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी आकाश पिंपळकर, रोहित हिवरे, गोविंदा राऊत, पिंटू निकोसे, भूपेश वासनिक, मंगेश बेंडे, सुनील पारशे, जया गाणार, सुशीला राऊत यांनी सहकार्य केले. यावेळी संजय चौधरी, पत्रकार विजय ठाकरे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




