सावनेर
संस्कार,शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त सावनेर तालुक्यातील उमरी येथे असलेल्या शिवतीर्थ टुरिझम येथे उद्या सोमवार 12 जानेवारी 2026 रोजी उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रम होणार आहेत. शिवतीर्थ टुरिझमचे संस्थापक डॉ. अभिविलास नखाते यांनी या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
राजमाता जिजाऊ यांचे विचार आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.




