गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी तालुका कृषी अधिकारी कळमेश्वर, जिल्हा नागपूर यांच्या अंतर्गत कोहळी येथील शेतकरी सुषमा वानखडे व आरती पदमवार यांच्या संत्रा बागेस भरत गोगावले, मा. मंत्री रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास, महाराष्ट्र राज्य यांनी सदिच्छा भेट दिली.
या भेटीप्रसंगी निलेश हेलोंडे पाटील (अध्यक्ष, वसंतराव नाईक राज्य स्वावलंबन मिशन), श्रावण भिंगारे (माजी सभापती, पंचायत समिती कळमेश्वर), संदीप इटकेलवार (शिवसेना नागपूर शहराध्यक्ष तथा विश्वस्त, एनआयटी नागपूर), बेबी शेळके (सरपंच, ग्रामपंचायत कोहळी), देवकांत वानखडे (उपसरपंच, कोहळी), अंकुश माने (संचालक, फलोत्पादन महाराष्ट्र राज्य), मनोज जवंजाळ (संचालक, महाऑरेंज), डॉ. राजकुमार सोनकर (वरिष्ठ शास्त्रज्ञ, सी.सी.आर.आय.), उमेश घाटगे (विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर विभाग), रवींद्र मनोहरे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर), बळीराम सातपुते (उपविभागीय कृषी अधिकारी, काटोल), दिपाली कुंभार (तालुका कृषी अधिकारी, कळमेश्वर), रचना भोसले (तंत्र अधिकारी), योगेश बोकसे (अध्यक्ष, कोहळी फार्मर प्रोड्युसर कंपनी), पुरस्कार प्राप्त शेतकरी भीमराव कडू, प्रगतशील शेतकरी प्रशांत गुळांदे, पोलीस पाटील प्रवीण वानखडे तसेच परिसरातील अनेक प्रगतशील शेतकरी व संत्रा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री महोदयांचे स्वागत कुणाल पदमवार व आरती पदमवार तसेच वानखडे परिवाराच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी मंत्री महोदयांनी संत्रा बागेची पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला व संत्रा बागायतदारांच्या अडचणी जाणून घेतल्या.
संत्रा ग्रेडिंग–पॅकिंग युनिट, प्रोसेसिंग युनिट तसेच संत्रा निर्यात (एक्सपोर्ट) या विषयांवर शेतकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन उज्वल डाखोळे, उप कृषी अधिकारी यांनी केले.
दौरा यशस्वी करण्यासाठी दिपाली कुंभार, उज्वल डाखोळे, विनोद डाहाट, रोशन नान्हे, अंकुश कंकाळे, पवन दुपारे, शशिकांत इंगोले, प्रेमराज फलके, युक्त सरप, स्नेहल गिऱ्हे, मोनाली कुंभारे आदींनी सहकार्य केले.




