Home राजकीय सामान्य कार्यकर्त्याला सर्वोच्च सन्मान नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड –...

सामान्य कार्यकर्त्याला सर्वोच्च सन्मान नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड – डॉ.राजीव पोतदार

86
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी घोषणा केली आहे. बिहारचे ज्येष्ठ नेते आणि लोकप्रिय आमदार नितीन नवीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
नितीन नवीन यांची ही नियुक्ती भारतीय जनता पार्टीच्या तत्त्वज्ञानाचे ज्वलंत उदाहरण आहे, जिथे एक सामान्य कार्यकर्ता आपल्या एकनिष्ठेने आणि संघटनात्मक कामाप्रती असलेल्या समर्पणाने एका चांगल्या संघटनेचे रूपांतर यशस्वी आणि प्रभावी संघटनेत करू शकतो. श्री. नितीन नवीन यांनी संघटनेच्या विविध स्तरांवर दीर्घकाळ कार्यरत राहून आपले अफाट संघटनात्मक कौशल्य आणि जनसामान्यांमध्ये असलेली मजबूत पकड सिद्ध केली आहे.
त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय अनुभवाचा पक्षाला राष्ट्रीय स्तरावर मोठा लाभ होणार आहे. बिहार सरकारमध्ये पथ निर्माण,नगर विकास आणि गृहनिर्माण विभागाचे प्रभावी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. विशेष म्हणजे, ते पाटणा येथील बांकीपुर विधानसभा मतदारसंघाचे सलग चार वेळा प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत. त्यांना संघटनेच्या कामाचा तसेच शासकीय कामकाजाचा प्रदीर्घ आणि बहुमूल्य अनुभव आहे.
“नितीन नवीनजी यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी झालेली निवड पक्षासाठी युवा नेतृत्व, नवा उत्साह, नवी दिशा आणि एक बळकट आधार ठरणार आहे. त्यांचा संघटनेचा आणि प्रशासनाचा अनुभव लक्षात घेता, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत होईल आणि त्यांच्या ध्येय-धोरणांना एक नवी उंची प्राप्त होईल, यात शंका नाही. जनसेवेसाठी आणि संघटनेच्या पुढील वाटचालीस डॉ.राजीव पोतदार यांनी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here