Home सामाजिक खापरखेडा येथे महिला भजन मंडळांना भजनी साहित्याचे वाटप

खापरखेडा येथे महिला भजन मंडळांना भजनी साहित्याचे वाटप

48
0

मौदा (तालुका प्रतिनिधी)
मौदा तालुक्यातील बारशी, खापरखेडा येथील महिलांच्या विनंतीला मान देत आणि सामाजिक बांधिलकी जपत कैलास बरबटे व मित्र परिवाराच्या वतीने स्वखर्चातून भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले. सियाराम महिला भजन मंडळ, खापरखेडा व जयदुर्गा महिला भजन मंडळ, बारशी यांना हे साहित्य सुपूर्द करण्यात आले.
या प्रसंगी खेमराज चाफले, नंदू मेहर, अजय वाघमारे, धीरज बरबटे, कमलेश महादुले, गणेश महादुले, कमलेश हिवसे, कमलाकर हिवसे, उमेश झलके, धर्मराज झलके, सुरेश झलके, रामप्रसाद झलके, सुरेश हिवसे, उत्तम कडू, विठ्ठाल ढोले, आशीष घरजाडे, गणेश झलके, श्रीकृष्ण हिवसे, क्रिष्णा भिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच रजनी बरबटे, सुरेखा बरबटे, उर्मिला उइके, भारती बरबटे, वंदना बरबटे, मीरा बरबटे, नेहा बरबटे, मंदा बरबटे, चंद्रकला बरबटे, देवकी बरबटे, रीता कडू, अनिता दोडके, शारदा झलके, मंदा झलके, राधा दोडके, देवकी हिवसे, रूपाली चौधरी, गोपी सूर्यवंशी, सुनंदा येनकर, संगीता घरझाडे यांच्यासह गावातील महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला भजन मंडळांच्या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपल्या जात असून, अशा उपक्रमामुळे महिलांना प्रोत्साहन मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कैलास बरबटे मित्र परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here