Home सांस्कृतिक व सामाजिक जगनाडे ना.सह.पत संस्थेत दिवाळी पुजन उत्साहात

जगनाडे ना.सह.पत संस्थेत दिवाळी पुजन उत्साहात

80
0

सावनेर : दिवाळी लक्ष्मीपूजनानंतर पाच दिवसांनी येणाऱ्या तिथीला बुधवारी घरोघरी पांडवपूजन व व्यवसाय वृद्धीसाठी व्यावसायिक प्रतिष्ठान व संस्थांमध्ये पंचमी पूजन उत्साहात साजरे करण्यात आले.शहरातील जगनाडे नागरी सहकारी पतसंस्थेत देखील अध्यक्ष अशोकराव उमाटे यांच्या हस्ते विधिवत अभिषेक पूजन पार पडले. 
याशिवाय संस्थेतील दैनिक ठेव प्रतिनिधींनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी सर्वच प्रतिनिधी व त्यांच्या  सौभाग्यवतींना भेटवस्तू व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.यात प्रामुख्याने संजय खोडनकर,राजेंद्र घटे,भगवान रायकवाड,चंद्रशेखर घोरमारे,योगेश दिवे,अक्षय मदनकर,महेश मदनकर,प्रकाश करांगडे,मोरेश्वर पराते,कमलाताई डोईफोडे,मोरेश्वर डाखोरे,विकास पुरे,संदीप नानवटकर,पंकज आसोलकर,सुरेखा घोळसे,सुरेखा पंडिया व इतर काही प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आले.   
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव उमाटे,उपाध्यक्ष गोपालराव घटे,सचिव चंद्रशेखर कावडकर,प्रकाश बागडे,प्रदीप बावनकर,धर्मराज घटे,सारिका पिसे,सुचिता देशमुख,योगेश मानकर,योगेश पाटील,प्रकाश बालपांडे, विलास कामडी,राजेन्द्र भक्ते आदी पदाधिकाऱ्यांसह व्यवस्थापक सोमेश्वर भुसारी,कर्मचारी अनिल दिवे,आशिष बांबल,प्रफुल गावंडे, आदित्य घोळसे,सपक शेख,भावना पडोले व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here