Home Breaking News जगनाडे नागरी सहकारी पतसंस्थेत पंचमी पूजन उत्साहात

जगनाडे नागरी सहकारी पतसंस्थेत पंचमी पूजन उत्साहात

43
0

कृणाल सातपुते (सावनेर तालुका प्रतिनिधी)
सावनेर
दिवाळी लक्ष्मीपूजनानंतर पाचव्या दिवशी साजऱ्या करण्यात येणाऱ्या पंचमीच्या निमित्ताने शहरातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांसह जगनाडे नागरी सहकारी पतसंस्था येथे बुधवारी पंचमी पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष अशोकराव उमाटे यांच्या हस्ते विधिवत अभिषेक व पूजन संपन्न झाले.
या प्रसंगी दैनिक ठेव प्रतिनिधींनी केलेल्या उल्लेखनीय कार्यगिरीबद्दल सर्व प्रतिनिधी व त्यांच्या सौभाग्यवतींना भेटवस्तू व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानित प्रतिनिधींमध्ये संजय खोडनकर, राजेंद्र घटे, भगवान रायकवाड, चंद्रशेखर घोरमारे, योगेश दिवे, अक्षय मदनकर, महेश मदनकर, प्रकाश करांगडे, मोरेश्वर पराते, कमलाताई डोईफोडे, मोरेश्वर डाखोरे, विकास पुरे, संदीप नानवटकर, पंकज आसोलकर, सुरेखा घोळसे, सुरेखा पंडिया आदींचा समावेश होता.
कार्यक्रमास अध्यक्ष अशोकराव उमाटे, उपाध्यक्ष गोपाल घटे, सचिव चंद्रशेखर कावडकर यांच्यासह प्रकाश बागडे, प्रदीप बावनकर, धर्मराज घटे, सारिका पिसे, सुचिता देशमुख, योगेश मानकर, योगेश पाटील, प्रकाश बालपांडे, विलास कामडी, राजेंद्र भक्ते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच संस्थेचे व्यवस्थापक सोमेश्वर भुसारी, कर्मचारी अनिल दिवे, आशिष बांबल, प्रफुल गावंडे, आदित्य घोळसे, सपक शेख, भावना पडोले यांच्यासह इतर मान्यवरांचाही कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
पंचमी पूजनानिमित्त संस्थेत आनंदी व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here