गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर येथील युवराज मेश्राम यांना’महाराष्ट्र रत्न गौरव’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. पुणे येथे पार पडलेल्या ‘रंग श्रावणाचा भारत गौरव सन्मान’ सोहळ्यात युवराज मेश्राम यांना शाल, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन ‘महाराष्ट्र रत्न गौरव’ सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. मेश्राम यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कला क्षेत्रात दिलेल्या सक्रिय सहभागाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.




