गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
समाजात ऐतिहासिक कामगिरी घडवत पारधी समाजाच्या दीपाली राजपूत यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) निवड होऊन एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील तिडंगी या छोट्याशा गावातील दीपाली राजपूत यांनी ही कामगिरी करून आपल्या कुटुंबासह संपूर्ण समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे एका विशेष कार्यक्रमात दीपाली यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांनी दीपाली यांना शुभेच्छा देत पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी प्रोत्साहन दिले.दीपाली राजपूत या सीआरपीएफसाठी निवड झालेल्या नागपूर जिल्ह्यातील पहिल्या पारथी कन्या ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे पारधी समाजातील युवक-युवतींना प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
दीपाली च्या मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासामुळे तिने हे यश प्राप्त केले.तिला या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून तिच्या यशस्वी कारकीर्दीसाठी कळमेश्वर तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील अनेक जण सदिच्छा व्यक्त करत आहेत.




