Home जागरुकता एन. सी. सी. कॅम्प हेटी सुरला, ता. सावनेर येथे घेण्यात आला सायबर...

एन. सी. सी. कॅम्प हेटी सुरला, ता. सावनेर येथे घेण्यात आला सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

42
0

दिनांक ०५/१२/२०२५ रोजी एन.सी.सी. कॅम्प हेटी, सुरला ता. सावनेर येथील विदयार्थी आणि विदयार्थीनींना सायबर पोलीस स्टेशन नागपुर ग्रामीण चे सहा. पोलीस निरीक्षक प्राची राजुरकर आणि मनापोशि संगिता गांवडे यांनी सायबर सुरक्षे बाबत जनजागृती केली. विदयार्थ्यांना खालील प्रमाणे महत्त्वाच्या मुद्दयांवर सविस्तर माहीती देण्यात आली.

१. सोशल मिडीया जाहीरातीवर लगेच विश्वास ठेवु नका.
२. अनोळखी मो. कं वरून आलेल्या बॅक / पोलीस / इतर शासकिय अधिकारी यांचे फोन किंवा मॅसेज बाबत पडताळणी करा.
३. मोबाईल मधील अॅप नेहमी प्ले स्टोअर किंवा अधिकृत संकेतस्थळा वरूनच डाउनलोड करावे.
४. सोशल मिडीयांवर येणाऱ्या अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट पासुन सावधान राहा.
५. कोणत्याही आमिषाला बळी पडु नका सायबर गुन्हेगाराच्या जाळयात अडकु नका.
६. ऑनलाईन गेम खेळतांना सतर्कता बाळगा.
७. अनोळखी मोबाईल क्रमांकावर आलेले व्हिडीओ कॉल उचलु नका.
८. Wedding Invitation card .apk, PM kisan apk, ADHAR CARD Update. apk या प्रकारचे ईतर apk फाईल्स वर क्लिक करू नये तसेच शेयर करू नये आपला मोबाईल हॅक होवु शकतो.

नागपुर ग्रामीण पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सायबर गुन्हयांची तक्रार नोंदविण्यासाठी www.cybercrime.gov.in या संकतेस्थळावर किंवा हेल्पलाईन कमांक 1930, 1945 यावर तकार नोंदवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here