आगामी नगर परिषद/नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने आज दिनांक २१/११/२०२५ रोजी श्री अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांनी पोलीस स्टेशन काटोल, नरखेड आणि खापा हद्दीतील एसएसटी (स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम) पथकाला तसेच स्ट्रॉग ला येथे भेट दिली. अनिल म्हस्के यांनी काटोल पोलीस स्टेशन हद्दीतील नागपुर टोल नाका आणि पारडसिंगा रोड, एसएसटी पथकाला भेट दिली. पोलीस स्टेशन नरखेड हद्दीतील नरखेड, मोहदी दळवी आणि बस स्टॉप चौक, मोवाड येथील एसएसटी पथकाला भेट दिली. तसेच मोवाड नगर परीषद आणि नरखेड नगर परिषद येथे स्ट्रॉग रूम ला भेट दिली. खापा पोलीस स्टेशन हद्दीतील फॉरेस्ट नाका, एसएसटी पथकाला आणि सिंदेवाणी येथील आंतरराज्यीय नाकाबंदी पॉईन्टला भेट देवुन तपासणी केली. खापा नगर परिषद येथील स्ट्रॉग रूम ला भेट दिली. श्री अनिल म्हस्के यांनी एसएसटी पथकाच्या सदस्यांना सतर्क राहण्याच्या तसेच बेकायदेशीर हालचालींवर सर्तकतेने नजर ठेवुन त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्ट्रॉग रूम चे सी.सी.टी.व्ही कॅमरे तसेच इतर सुरक्षा उपाययोजना स्वतः तापासुन संबधीतांना महत्त्वाच्या सुचना दिल्या.
सदर भेटी दरम्यान श्री अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्यासह निवडणुक अधिकारी तसेच इतर प्रशासकिय अधिकारी आणि संबधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हजर होते.
Home Breaking News अपर पोलीस अधिक्षक,नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी पोलीस स्टेशन काटोल, नरखेड आणि खापा...




