Home अपराध पोलीस असल्याची बतावणी करून दरोडा टाकणाऱ्या ७ आरोपीतांना खापा पोलीसांनी अवघ्या ४...

पोलीस असल्याची बतावणी करून दरोडा टाकणाऱ्या ७ आरोपीतांना खापा पोलीसांनी अवघ्या ४ तासात केले अटक

43
0

तक्रारदार नामे अंबर हरीप्रसाद साहु, वय २३ वर्ष, रा. ग्राम सावरी बजार ता. मोखेड, जि. छिदंवाडा यांनी तक्रार दिली की, १७/११/२०२५ चे रात्री ११/०० वा ते १२/०० वा दरम्यान यातील फिर्यादी आणि त्याचे साथीदार नामे प्रशांत शर्मा आणि माहवाहु वाहन कं एम.पी. २८ झेड जे. ७१६९ चा चालक आकाश पठारे असे रायपुर येथे मालवाहु वाहनामध्ये लाख घेवुन जात असतांना खापा जवळ पारिशवणी रोड कडे जात असातांना ६ अज्ञात आरोपीतांनी त्यांच्या गाडीला हात दाखवुन थांबविले. त्या अज्ञात अरोपीतांनी ते पोलीस असल्याचे सांगुन ते नाकाबंदी करीत असल्याचे भासविले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या साथीदारांचे मोबाईल तसेच वाहनाची चाबी काढुन घेतली. त्यांना चालन आकारले असे सांगुन त्यांच्या कडुन ३०००/- रूपये घेतले. आरोपीतांनी फिर्यादीची गाडी पोलीस स्टेशन येथे लावली लागेल असे सांगुन त्यांना आरोपीतांच्या कार मध्ये बसण्यास सांगितले. फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्यांनी बसण्यास नकार दिला असता त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीतांनी फिर्यादी आणि त्यांचा साथीदार प्रशांत शर्मा यांना त्यांच्या कार मध्ये बसविले. आणि मालवाहु वाहनाचा चालक आकाश पठारे याला वाहनाजवळ थांबविले. आरोपीतांनी त्यांची कार काही अंतरावर नेवुन फिर्यादी आणि प्रशांत शर्मा यांना मोबाईल परत देवुन सोडुन दिले. ते दोघे त्यांच्या मालवाहु वाहनाजवळ परत आल्यानंतर वाहनात लाखेच्या बोऱ्या नव्हत्या. तेव्हा आकाश पठारे यांनी सांगितले की, एक मालवाहु गाडी आली होती त्यातुन दोघे इसमांनी उतरून लाख त्यांच्या वाहनात टाकुन नेली. अशा प्रकारे अज्ञात ६ आरोपीतांनी फिर्यादी आणि त्यांच्या साथीदारांना जिवाने मारण्याची धमकी देवुन दरोडा टाकुन त्यांच्या ताब्यातील ३० बोरी लाख किंमती ५,००,०००/- रुपये घेवुन गेल्याचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन खापा येथे कलम ३१०(२), २०४ भा.न्या.सं अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

सदर गुन्हयाचे गांर्भिय लक्षात घेता मा. श्री हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात खापा पोलीसांनी नमुद गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पथक तयार केले. नमुद पोलीस पथकाने कौशल्यपुर्ण तपास करत दिनांक १८/११/२०२५ रोजी अवघ्या ४ तासात आरोपी माहवाहु वाहन कं एम.पी. २८ होड जे. ७१६९ चा चालक आकाश पठारे याला ताब्यात घेवुन कसुन चौकशी केली असता त्याने त्याचे ६ साथीदारांसह मिळुन सदर गुन्हा केल्याची केल्याची कबुली दिली. पोलीसांनी सदर प्रकरणात आरोपी १. अब्दुल हनीफ शेख, वय ३२ वर्ष, रा पवन गाव, पारडी, २. आकाश हिरालाल पठारे, वय २२ वर्ष, रा. भजई मोखेड, जि छिंदवाडा ३. आशिष उर्फ मराठा विनोद शर्मा, वय २४ वर्ष, रा. भरतवाळा, नागपुर, ४. आकाश रमेश बोकडे, वय ३२ वर्ष, रा. कळमना, नागपुर, ५. सुरज रमेश बोकडे, वय २३ वर्ष, रा. कळमना नागपुर, ६. बादल रमेश बोकडे, वय २८ वर्ष, रा. कळमना, नागपुर, ७. जितेंद्र किशेर लांभते, वय २४ वर्ष रा विनोबाभावे नगर, नागपुर यांना अटक केली आहे.

30 पोलीसांनी आरोपीतांच्या ताब्यातुन गुन्हयात लाख नेण्याकरीता वापरलेले छोटा हाथी मालवाहुन वाहन क्रमांक एम.एच ४९ डी ३२४३ किंमती २,५०,०००/- रुपये बोऱ्या लाख किंमती ५,००,०००/- रुपये असा एकूण ७,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे. नमुद आरोपीतांना मा न्यायालयाने दिनांक २१/११/२०२५ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here