Home Breaking News आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील शासनाच्या योजनेंतर्गत पट्टे...

आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील शासनाच्या योजनेंतर्गत पट्टे वाटप

53
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
आज दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील अनेक गरजू नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला.तालुक्यातील पात्र व गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेंतर्गत पट्टे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री. मनोहर कुंभारे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, श्री. अजय हटकर, उपविभागीय अधिकारी श्री. संपत खलाटे,गटविकास अधिकारी,मनोज कुमार हिरूडकर,सौ.अंशुजा गराटे, सावनेर चे तहसीलदार श्री.अक्षय पोयम, कळमेश्वर चे तहसीलदार श्री. विकास बिक्कड , श्री.अरविंद लोधी, श्री.धनराज देओके, श्री. प्रतीक कोल्हे,श्री.मंदार मंगळे, श्री. पियुष बुरडे, श्री. शैलेंद्र अस्वले, श्री. रोहित मुसळे, श्री. रामराव मोवाडे, श्री. महेश चकोले तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी सर्व लाभार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले – “शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीला त्याचा हक्क सन्मानाने मिळावा.यासाठी मी सदैव कटिबद्ध आहोत असे डॉ.देशमुख म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here