विद्यार्थ्यांनो..! जर तुम्ही कौशल्य हस्तगत केले तरच मराठी भाषासुद्धा तुम्हाला रोजगार प्राप्त करून देऊ शकते.म्हणून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी कौशल्याची कास धरली पाहिजे.मराठी भाषेतील अभंग,ओव्या, पाळणे,म्हणी,वाक्प्रचार आजही खेड्यातच जिवंत आहे. खेडी ही लोकसंस्कृती, लोकजिवनाला अर्थ प्राप्त करून देते.आपली मराठी बोलीभाषा प्रत्येकाने जतन केली पाहिजे.मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक संवादी होणे ही काळाची गरज आहे.असे प्रतिपादन स्व.हरिभाऊ आदमने महाविद्यालय सावनेर येथिल मराठीचे प्राध्यापक डाॅ.प्रमोद लेंडे खैरगावकर यांनी केले.ते यावेळी महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय पारशिवनी येथिल मराठी विभागाद्वारे आयोजित मराठी वाड्मयमंडळाच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्पा अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.लोकचंद्र जाधव,आयोजक मराठी विभागप्रममुख प्रा.डाॅ.राकेश कभे,आक्युएसीचे प्रमुख डाॅ.प्रमोद गोरडे,डाॅ.शेंडे उपस्थित होते.
मराठी भाषेत शिकणार्या वाड्मयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेची महती लक्षात घेतली पाहिजे.भाषेची परंपरा, अभिजातता,आधुनिकता व उद्योगातील तीचे स्थान यासर्वांचा आढावा घेऊन आपण भाषेच्या कौशल्यातून स्वतःला घडवले पाहिजे असेही डाॅ.प्रमोद लेंडे खैरगावकर म्हणाले.यावेळी मराठी अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.मराठी साहित्याची गौरवशाली परंपरा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मराठी भाषा यावर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून आयोजक प्रा.डाॅ.राकेश कभे यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.जाधव यांनी मराठी विभागाच्या उपक्रमाचा गौरव करून विद्यार्थी महाविद्यालयातून वाड्मयीनदृष्ट्या कसे समृद्ध होतील अशी आशा व्यक्त केली.या कार्यक्रमाला मराठी भाषा,मराठी वाड्मय अभ्यासक्रमाचे तसेच मानव्येशास्त्र विभाग,वाणिज्य विभागाचेही विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्रा.महेंद्र भलमे, प्रा.महेश चोंदे,प्रा.संदीप भोयर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाची मदत केली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विजया वानखेडे यांनी केले.तर आभार प्रा.प्रांजली हाडगे यांनी व्यक्त केले.
Home Breaking News विद्यार्थ्यांनो..! कौशल्य असल्यास मराठी भाषेतूनही रोजगार साध्य – डाॅ.प्रमोद लेंडे खैरगावकर




