Home Breaking News कळमेश्वर तालुक्यातील पांधण रस्त्याच्या समस्येला केव्हा बसेल अंकुश ?

कळमेश्वर तालुक्यातील पांधण रस्त्याच्या समस्येला केव्हा बसेल अंकुश ?

89
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील अनेक गावांमध्ये पांधण रस्त्याची कामे झाली असून अथवा काहींची कामे सुरू असून त्या कामांमध्ये ठेकेदार व राजकीय वर्ग यांच्या कडून अधिकाऱ्यांना हातात धरून वारंवार निकृष्ट दर्जाची काम होत असून तालुक्यातील अनेक गावातील पांधण रस्ते पावसाळ्याच्या पहिल्याच पाण्यात वाहून गेले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.
तर काहींची कामे अजून पर्यंत प्रलंबित असून त्यामध्ये अधिकारी यांच्याकडून कामे झाले असल्याची माहिती कागदोपत्री दाखवून पैसे लाटल्याचा प्रकार तालुक्यात गावामध्ये जोरात – सौरात पाहायला मिळत आहे. या असल्या भौगळ कारभारामुळे तालुक्यातील नागरिकांची पांधण रस्त्याने जाण्याचे तर सोडा शेती करणे सुद्धा अडचणीत आली आहे.अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेताजवळील पांधण रस्त्यांच्या काम निकृष्ट दर्जाच्या केले असल्यामुळे पावसाच्या पाण्याची तळे शेतात साचलेली पहायला मिळत आहेत.
त्यात कित्येक वर्षापासून रखडलेले तेलकामठी ते हेटी (नंदाजी) ग्रा.मा.१९ वरील शेतकरी देविदास बाबुराव तुरणकर यांच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत 3054 अंतर्गत होत असलेल्या पांधन रस्तेच्या कामाबाबतच्या तक्रारीचा सुद्धा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here