Home सांस्कृतिक व सामाजिक प्रिया रमेश मानकर यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त गावोगावी “भारतीय संविधान”...

प्रिया रमेश मानकर यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त गावोगावी “भारतीय संविधान” जागर अभियान

2
0

गिरीश आंदे
दि. 14 एप्रिल 2026 ला प्रिया रमेश मानकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त धापेवाडा जिल्हा परिषद सर्कल मधील धापेवाडा,घोराड, उबाळी, वरोडा,पिपळा कि.,बोरगाव खु., भडांगी, सावळी, मढासावंगी, परसोडी, कन्याडोल, सिंधी, सोनापार,या प्रत्येक गावातील बौद्ध विहारात भेट देऊन. प्रिया रमेश मानकर यांनी त्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार घालून व त्या बौद्ध विहाराला एक भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची मोठी फ्रेम तसेच काही गावांमध्ये भारताच्या संविधानाची प्रत अर्पण करून 14 एप्रिल हा दिवस साजरा करण्यात आला. आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. असे प्रत्येक गावच्या ग्रामस्थांचे म्हणणे होते.
या प्रसंगी धापेवाडच्या सरपंच मंगला शेटे, धापेवाडा बोद्ध विहाराचे अध्यक्ष भिमराव दंबाळे,शितल सवाईतुल,तसेच प्रत्येक गावातील बौद्ध विहाराचे नेतृत्व करते व गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा व भारताच्या संविधानाबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असावी याकरिता माध्यमिक स्तरावर शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधान हा स्वतंत्र विषय असावा याकरिता एक मोहीम सुद्धा सुरू करण्यात आली आहे.असेही यावेळी प्रिया रमेश मानकर यांच्याकडून प्रतिपादन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here