गिरीश आंदे
नागपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन डॉ. राजीव पोतदार यांना विधान परिषद सदस्य म्हणून उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यात आली.
भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी डॉ. पोतदार यांचा पक्षातील दीर्घ अनुभव, संघटन मजबूत करण्यासाठी केलेले योगदान, कार्यकर्त्यांशी असलेले घट्ट नाते आणि प्रशासनाकडून काम करून घेण्याची त्यांची क्षमता यावर भर दिला. गेल्या ३० वर्षांपासून विविध पदांवर काम करत त्यांनी पक्ष आणि निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये डॉ. पोतदार यांना उमेदवारी द्यावी, असा एकमताचा सूर दिसून येत आहे. नेत्यांकडूनही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.
या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, माजी आमदार सुधीर पारवे, अशोक धोटे, दिनेश ठाकरे, रामराव मोवाडे, उकेश चव्हाण, किशोर चौधरी, इमेश्वर यावलकर, आदर्श पटले, धनराज देवके, दिलीप धोटे, अविनाश माकोडे, संदीप सरोदे, समीर उमप, बापू हळदे, उज्वला बोढारे,प्रिया मानकर, आयुश्री धपके,रेवतकर ताई, रोहित मुसळे, मंदार मंगळे, पियुष बुरडे, अनिकेत अंतुरकर, प्रतिक कोल्हे,मोहसीन पटेल, दिगांबर सुरतकर, सुरेंद्र शेंडे यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी एकमुखी समर्थन दर्शवले.
Home राजकीय डॉ.राजीव पोतदार यांना विधान परिषद उमेदवारी देण्याची नागपूर जिल्हातील भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी




