दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 8:45 वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कामावर जात असताना नागपूर वरून काटोल मार्गावर जात असणारी ट्रॅव्हल्स बस MH 40 Y 0013 वाहनाने चिरडले.
या संपूर्ण घटनेत स्थानिक लोकांनी व सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे यांनी तत्परता दाखवत मृत महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कळमेश्वर मनोजजी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे, मनीष सोनवणे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.


