सावनेर दि. 22 : सकल धनगर समाज विदर्भ बँनर खाली महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ, धनगर युवक मंडळ, धनगर अधिकारी कर्मचारी संघटना म रा, अहिल्यादेवी स्मृती स्मारक समिती, अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ, धनगर संघर्ष समिती, मल्हार सेना ,जागृती मंच व इतर विविध सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमाने 22 डिसेंबर 2024 रविवारी रविभवन काँटेज क्रमांक 18 नागपूर येथे सकाळी 9 वाजता मा.नामदार प्रा राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती पदी एकमताने निवड झाल्या बद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.प्रसंगीं सकल धनगर समाजाचे मुख्य समन्वयक पुरुषोत्तम डाखोळे, अमरावती विभाग समन्वयक अँड दिलीप एडतकर, धनगर युवक मंडळचे अध्यक्ष रमेश पाटील, धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले, महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रा बाबा टेकाडे अहिल्यादेवी स्मृती स्मारक समितीचे महादेव पातोंड,जागृती मंचचे उत्तम चिव्हाणे आदी मान्यवर प्रामुख्याने मंचाकावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पूजाअर्चा पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम डाखोळे यांनी केले सुत्र संचालन रामचंद्र चुकांबे यांनी केले पुरुषोत्तम थोटे यांनी आभार मानले यावेळी प्रा राम शिंदे यांनी आपले सत्कारपर मनोगत व्यक्त करुन समाजाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.288 लोक होते त्यापैकी काही पडले मात्र यांपैकी मी एकटा असा आहे की जिकलेल्या लोकांचे नेतृत्व करीत आहे मी निवडणूक लढलो ते शरद पवाराच्या घराण्यातला माणूस पाडण्यासाठी सर्वाधिक मते घेऊन पराजीत झालेला राज्यातला चौथ्या क्रमांकावर आहे वेळोवेळी आपण दाखवून देतो की मी धनगर आहे यानंतर काहीतरी होणार असी चर्चा होती त्यात मंत्री, प्रदेशादक्ष किंवा विधानसभा सभापती पद मिळेल असे वाटत होते अन सभापती पद मिळाले आपल्या समाजाचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा भूमिका घेऊन निराकरण करण्यात येईल अहिल्यादेवीच्या कुटुंबातील आहे त्यामुळे सेवांचे व्रत रक्तातच आहे जेव्हा उपसभापतीने सांगितले की बहुंताने ठराव पास परंतु विरोधकांनी एकमताने ठराव पास असे म्हटले हे विशेष आपण दुसऱ्याला खूप खुल्या मनाने समर्थन करतो पण आपल्या माणसाला समर्थन द्यायची वेळ आली तर मात्र संकोच करतो असा माझा अनुभव आहे 1995 पासून महिलाची मोठ्या प्रमाणात उपस्थित वाढली येत्या कालखंडामध्ये सगळ्या प्रश्नाचे वेळेस कधीही हक्काने येण्यास आपल्यासाठी मार्ग खुला आहे आपण सर्व एवढ्या मोठ्या प्रमाणात माझा मानसन्मान सत्कार केला त्याबद्दल आपणा सर्वांचे मी तुम्हाला ऋण व्यक्त करतो आभार मानतो असे सांगितले
यावेळी विविध संघटनेचे वतीने प्रा राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यात सकल धनगर समाजचे पुरूषोत्तम डाखोळे धनगर युवक मंडळचे रमेश पाटील धनगर अधिकारी कर्मचारी संघटना म रा चे अनिलकुमार ढोले अहिल्यादेवी होळकर स्मृती स्मारक समितीचे महादेव पातोंड महाराष्ट्र राज्य धनगर महासंघाचे प्रा बाबा टेकाडे बाळासाहेब काळमेघ धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर जिल्हाचे धर्मेंद्र बुधे धनगर समाज संघर्ष समितीचे डाँ विनोद बरडे धनगर जागृती मंचचे उत्तम चिव्हाणे सकल धनगर समाज अमरावतीचे अँड दिलीप एडतकर मल्हार सेनेचे पुरुषोत्तम थोटे अहिल्यादेवी होळकर महिला मंडळच्या डॉ हर्षा पाटील धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महिला आघाडी चे अनुराधा थोटे कृषी विद्यापीठ चे डाँ काटकर धनगर अधिकारी कर्मचारी संघटना यवतमाळ पवन थोटे मल्हार सेना अमरावती उमेश घुरडे धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वरुड प्रा काळमेघ रासप चे रामदास माहुरे पांढरकवडा येथील रामचंद्र आडते पाल सेवा संघ नागपूर राकेश पाली तसेच विविध संघटनेचे सहकारी नागपूर, वर्धा, नागपूर ग्रामीण, अमरावती, यवतमाळ, अकोला , चंद्रपूर येथील समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




