सावनेर
सार्वजनिक बांधकाम विभाग सावनेर शहर अंतर्गत प्रगतीत आणि प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांच्या आढावा सबंधित पत्रकार परिषद आज शनिवार दिनांक ०५ जुलै २०२५ रोजी दुपारी ०४.३० वाजता, मा.आ.डॉ.आशिषराव देशमुख ह्यांच्या जनसंपर्क कार्यालय पॉम कोर्ट लॉन नागपूर रोड सावनेर येथे “सावनेर शहर नवनिर्माण विकास उद्दिष्ट कार्यक्रम अंतर्गत” सावनेर शहरातील समस्त नागरिकांना सदर प्रकल्पबाबतच्या खालील मुद्यान्वये अवगत करण्याकरिता पत्रकार परिषदचे आयोजन डॉ.आशिषराव देशमुख आमदार सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्र यांच्याकडून करण्यात आले होते.
मंजूर कामे
१)कामाचे नाव :- आमदार निधी अंतर्गत गांधी चौक परिसरात १२५ फूट ध्वज स्तंभउभारणे व सौंदर्यकरण करणे. किंमत:- रु. १.०० कोटी
२)कामाचे नाव :- केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत बोरुजवाडा ते गांधी चौक पर्यंत रस्ता रुंदीकरण व सौंदर्याकरण करणे. किंमत:- रु. २६.०० कोटी
३)कामाचे नाव :- विधी व न्याय विभाग अंतर्गत सावनेर येथील G+५ नवीन न्यायालयीन इमारत बांधकाम करणे. (६ कोर्ट हॉल + १ पॉक्सो + १ लोक अदालत). किंमत:- रु. ४४.०० कोटी
प्रस्तावित कामे
१) कामाचे नाव :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर संलग्नीत आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर अंतर्गत २० खाटांचे रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करूण १०० खाटांचे रुग्णालयाचे बांधकाम करणे. अंदाजीत किंमत रु :- ६८.७० कोटी
२)कामाचे नाव :- तालुका सावनेर, सावनेर शहर अंतर्गत अस्तित्वात होत असलेले कै. श्री रामगणेश गडकरी यांचे सभागृहाचे ६०० बैठक व्यवस्था असलेली सर्व सोईसुविधा युक्त भव्य सभागृहाचे बांधकाम करणे. अंदाजे किंमत रु :- ४३.०० कोटी
३)कामाचे नाव :- तालुका सावनेर येथील विस्तारित प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे. अंदाजे किंमत रु :- ३०.०० कोटी
४)कामाचे नाव :- तालुका सावनेर येथे ०६ नवीन न्यायाधीश निवासस्थान बांधकाम करणे. अंदाजे किंमत रु :- १५ कोटी
५)कामाचे नाव :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर संलग्नीत आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे गट अ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,आंतरवासिता वसतीगृह व कर्मचारी निवासस्थानाच्या नवीन इमारत बांधकाम करण्याबाबत. अंदाजे किंमत रु :- ५५.०० कोटी
प्रस्तावित कामे
१)कामाचे नाव :- दहा खाटांचे ट्रामा केअर सेंटर व इतर रुग्णव्यवस्था यांची बांधकाम करणे. किंमत रु :- १०.८३ कोटी
२)कामाचे नाव :- महसूल कर्मचारी व अधिकारी यांचे निवासस्थानाचे बांधकाम करणे. किंमत रु :- १२.०० कोटी
३)कामाचे नाव :- सार्वजनिक बांधकाम अंतर्गत विस्तारीत विश्रामगृहाचे बांधकाम करणे तालुका सावनेर जिल्हा नागपूर. सुधारित किंमत रु :- ४.९२ कोटी
४)कामाचे नाव :- जिल्हा खनिकर्म विभाग अंतर्गत सावनेर शहरात नवीन फुट्सल ग्राऊंडचे बांधकाम करणे. किंमत रु :- ६० लक्ष




